पश्चिम बंगालमध्ये मतदानाच्या दिवशीच ईव्हीएम-व्हीव्हीपॅट यंत्रे फेकली पाण्यात ; आयोगाने मागितला अहवाल,व्हिडीओ व्हायरल

EVM-VVPAT machines । लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्याच्या निवडणुकीसाठी आज सकाळी मतदानाला सुरुवात झाली. सातव्या टप्प्यात आठ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील लोकसभेच्या ५७ जागांवर मतदान होत आहे. तिसऱ्या टप्प्यात 10.06 कोटी मतदार 904 उमेदवारांचे भवितव्य ठरवणार आहे. देशात एकीकडे मतदान सुरळीत पार पडत असताना तिकडे पश्चिम बंगालमध्ये ईव्हीएम मशीन पाण्यात फेकण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
पश्चिम बंगालच्या दक्षिण 24 परगणामधील कुलताईच्या 40 आणि 41 क्रमांकांच्या मतदान केंद्रावरील EVM आणि VVPAT मशीन तलावात फेकले. याठिकाणी जमावाकडून हे कृत्य करण्यात आले असल्याचे सांगण्यात येत आहे.
स्थानिक जमावाने EVM लुटले EVM-VVPAT machines ।
याबाबत माहिती देताना पश्चिम बंगालच्या मुख्य निवडणूक कार्यालयाकडून यासंबंधी माहिती देण्यात आली आहे. माहितीनुसार, सेक्टर ऑफिसरने एफआयआर दाखल केला आहे. घडलेल्या प्रकारावर आवश्यक कारवाई सुरू केली असल्याचे सांगण्यात येत आहे.
पश्चिम बंगालच्या सीईओ यांनी पोस्ट शेअर करत”आज सकाळी 6.40 वाजता बेनीमाधवपूर एफपी शाळेजवळ सेक्टर ऑफिसरचे ईव्हीएम आणि कागदपत्रे राखीव ठेवा, 19-जयनगर (एससी) पीसीच्या 129-कुलताली एसी येथे स्थानिक जमावाने लुटले आणि 1 सीयू. , 1 BU, 2VVPAT मशिन एका तलावात टाकण्यात आल्या आहेत.” असे म्हटले.
सीईओ पुढे म्हणाले,”सेक्टर अंतर्गत सर्व सहा बूथमध्ये मतदान प्रक्रिया अखंडपणे सुरू आहे. “सेक्टर ऑफिसला नवीन ईव्हीएम जोडले. गेले आहेत. तसेच नव्याने कागदपत्रे प्रदान करण्यात आली आहेत,”अशी माहिती दिली आहे.
VIDEO | Lok Sabha Elections 2024: EVM and VVPAT machine were reportedly thrown in water by a mob at booth number 40, 41 in Kultai, South 24 Parganas, #WestBengal.
(Source: Third Party)#LSPolls2024WithPTI #LokSabhaElections2024 pic.twitter.com/saFiNcG3e4
— Press Trust of India (@PTI_News) June 1, 2024
बंगालमध्ये 9 जागांसाठी मतदान EVM-VVPAT machines ।
पश्चिम बंगालमधील लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि शेवटच्या टप्प्यातील नऊ जागांसाठी शनिवारी कडक सुरक्षा व्यवस्थेत मतदान सुरू आहे. दमदम, बारासत, बशीरहाट, जयनगर, मथुरापूर, डायमंड हार्बर, जादवपूर, कोलकाता दक्षिण आणि कोलकाता उत्तर या मतदारसंघात संध्याकाळी ६ वाजेपर्यंत मतदान सुरू राहणार आहे.
17,470 मतदान केंद्रांवर 83.19 लाख पुरुष, 80.20 लाख स्त्रिया आणि 538 तृतीय लिंगाच्या व्यक्तींसह एकूण 1.63 कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
(1/2)
Today morning at 6.40 am Reserve EVMs & papers of Sector Officer near Benimadhavpur FP school, at 129-Kultali AC of 19-Jaynagar (SC) PC has been looted by local mob and 1 CU, 1 BU , 2VVPAT machines have been thrown inside a pond.— CEO West Bengal (@CEOWestBengal) June 1, 2024
निवडणूक आयोगाने अंतिम टप्प्यासाठी 33,000 राज्य पोलिसांसह केंद्रीय दलाच्या 967 कंपन्या तैनात केल्या आहेत, अधिकाऱ्याने सांगितले की, कोलकातामध्ये 11,000 राज्य पोलिसांसह केंद्रीय दलाच्या 246 कंपन्या तैनात केल्या जातील. केंद्रीय दलाच्या एकूण 384 कंपन्या दक्षिण 24 परगणा जिल्ह्यात तैनात केल्या जातील, तर 116 कंपन्या बसीरहाटमध्ये ड्युटीवर असतील.





