Satara | राज्यातील परिवर्तनाच्या लाटेमध्ये सर्वांनी सहभाग नोंदवावा

कोरेगाव, (प्रतिनिधी) – कोरेगाव विधानसभा उद्या मतदारसंघाच्या कोरेगाव खटाव आणि सातारा तालुक्याच्या ग्रामीण भागामध्ये असंख्य प्रश्नांना न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला.
मतदारांनी यावेळी योग्य भूमिका घेऊन खासदार शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील परिवर्तनाच्या लाटेत सहभाग दर्शवला तर कोरेगाव मतदारसंघाचे सर्व प्रश्न सोडविले जातील.
या मतदारसंघाचे नंदनवन करू, अशी ग्वाही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते माजी मंत्री आमदार शशिकांत शिंदे यांनी दिली.
नवी मुंबईच्या माथाडी भवनमध्ये कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील आणि सातारा जिल्ह्यातील नागरिक असलेल्या बृहन्मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि पनवेल परिसरातील रहिवासी,
माथाडी कामगार व कार्यकर्त्यांचा संवाद मेळावा रविवारी झाला. त्यावेळी संवाद साधताना आमदार शिंदे बोलत होते. यावेळी विविध माथाडी संघटनातील पदाधिकारी आजी-माजी नगरसेवक उपस्थित होते.
आमदार शिंदे पुढे म्हणाले की, जावली तालुक्यातून मुंबईचा रस्ता धरलेल्या माथाडी कामगारांच्या कुटुंबामध्ये माझा जन्म मुंबईत झाला.
या परिसरामध्ये राहणाऱ्या सर्व लोकांच्या प्रश्नांची जाण निश्चितपणाने मला आहे. खासदार शरद पवार यांचा आशीर्वाद मिळाला. माझ्यासारखा कार्यकर्ता महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये चार वेळा आमदार म्हणून निवडून आला.
एक वेळा विधानपरिषदेमध्ये आमदार झाला, या राज्याचा मंत्री झाला नव्हे तर कोरेगावच्या या मतदारसंघांमध्ये दोन वेळा निवडून आला. जावलीच्या मतदारसंघांमध्ये सुद्धा कार्यकर्ते आणि सामान्य नागरिकांनी इतिहास घडवला.
साताऱ्यातील जनतेने प्रेम केलं. त्या वेळेला डोंगरदऱ्यांमध्ये प्रश्न बघितले आणि तिथे जात तिथे जाता येत नव्हतं मी तिथे गेलो. अशक्य असलेल्या गोष्टी करून दाखवल्या. अनेक विकासाची आणि लोकहिताची काम केली असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले.
खासदार शरद पवार यांनी पवार कोरेगावची मला जबाबदारी दिली, मी ती अभिमानाने सांगेल की यशस्वीरित्या पार पाडली. कोरेगावच्या जनतेने मला उचलून धरलं.
काय ओळख होती माझी.. ओळख एवढीच होती की जिल्ह्यामध्ये काम करणारा हा कार्यकर्ता आहे आणि आपल्या भागामध्ये आलं तर काहीतरी सोन करेल, काहीतरी विकास करेल, अशा प्रकारची भावना होती. यावेळी माथाडी कामगार नेत्यांसह विविध मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले.





