आमच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्य ‘ईडी’च्या प्रश्नांची उत्तरे देण्यास तयार : रॉबर्ट वाड्रा

नवी दिल्ली : नॅशनल हेराल्ड प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने राहुल गांधींना चौकशीसाठी बोलावले आहे. या प्रकरणी रॉबर्ट वाड्रा यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, तुम्ही आमच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याला बोलावले तरी आम्ही यायला तयार आहोत. तुम्ही जे काही प्रश्न विचाराल, आम्ही त्यांना स्पष्ट करण्यासाठी उत्तर देऊ, असं वाड्रा यांनी ईडीला उद्देशून म्हटलं.
वाड्रा पुढे म्हणाले की, या सरकारची मोडस ऑपरेंडी सर्व एजन्सी वापरण्याची आहे. जेव्हाही त्यांचा एखादा प्रवक्ता चुकीचे बोलतो आणि देशाचे वातावरण बिघडवले जाते, तेव्हा ते लपवण्यासाठी माझे किंवा माझ्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याचे नाव घेतले जातं.
राहुल मजबूत आहेत आणि ते प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देतील. मला आशा आहे की ईडी त्याच्यासोबत जास्त वेळ घालवणार नाही. जे काही प्रश्न असतील, त्यांची उत्तरे मिळाल्यावर ईडीची तारांबळ उडेल, असा टोलाही वाड्रा यांनी लगावला.
दरम्यान ईडीने मला 15 वेळा कॉल केला. मी त्यांना २३ हजार कागदपत्रे दिली आहेत. मी त्यांच्या प्रत्येक प्रश्नाची उत्तरे दिली. मी मागील दोन आठवड्यात राहुल यांच्याची बरीच चर्चा केली. राहुल यांना कुठलाही सल्ला देण्याची गरज नाही. ते अतिशय हुशार नेते आहेत. त्यांच्याकडे सर्वकाही हाताळण्याची क्षमता असल्याचं वाड्रा यांनी म्हटलं.





