अखेर संभाजी बिडीचे नाव बदलले; ‘हे’ आहे नवीन नाव

Updated On:

पुणे – महापुरुषांची नावे नकोशा उत्पदनांना देण्यास कायमच विरोध होत होता. मागील अनेक वर्षांपासून महाराष्ट्रात साबळे-वाघिरे व्यवसाय समूह छत्रपती संभाजी महाराजांचे नाव वापरून बिडीचे उत्पादन करत आहे. राष्ट्रपुरुषांचे नाव वापरून तंबाखूजन्य पदार्थांचे उत्पादन बंद करावे, अशी मागणी अनेक संघटनांकडून करण्यात येत होती. या मागणीच्या पाठपुराव्याला आता यश आले आहे.

छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाने सुरू असलेल्या बिडीचे नाव बदलण्यात यावं, अशी मागणी केली जात होती. मात्र या मागणीला संबंधित कंपनीकडून हवा तसा प्रतिसाद दिला जात नव्हता. मागील वर्षी कंपनीने नाव बदलण्याची घोषणाही केली, मात्र प्रत्यक्षात तसे घडले नाही. आता अखेर संभाजी बिडी हे नाव बदलण्यात आलं आहे.

छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाने विकल्या जाणाऱ्या बिडीची आता ‘साबळे बिडी’ या नावाने विक्री होणार आहे. त्यामुळे ‘संभाजी ब्रिगेड’ सह इतर अनेक संघटनांच्या लढ्याला यश आलं आहे. तसेच संघटनांनी कंपनीच्या या निर्णयाचं स्वागत केलं आहे.

कोल्हापूर येथे 20 ऑगस्ट 2020 रोजी संभाजी ब्रिगेडचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष रुपेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली संभाजी बिडीची गाडी पकडली होती. ज्या ज्या ठिकाणी विक्री केली जात होती त्या व्यापाऱ्यांना संभाजी ब्रिगेडने विरोध करण्यास भाग पाडले. व्यापाऱ्यांनी सुद्धा विक्री करण्यास बंद केले व सुमारे 20 लाख रुपयाचा जुना माल कोल्हापुरातील व्यापाऱ्यांनी साबळे-वाघेरे कंपनीला परत पाठवला होता. त्यानंतर 10 सप्टेंबर 2020 रोजी साबळे कंपनीने अधिकृत पत्रकार परिषद घेऊन नाव बदलणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानुसार आता हे नाव बदलण्यात आले आहे.

टॅग्स:

आणखी संबंधित बातम्या

पुणे जिल्हा : निमगाव सावात धुमाकूळ घालणार्‍या बिबट्या जेरबंद

2024-06-02 09:08:11

पुणे जिल्हा : निमगाव सावात धुमाकूळ घालणार्‍या बिबट्या जेरबंद

पिंपरी | उद्यानात धूम्रपान, अस्वच्छता करणार्‍यांवर कारवाई करा

2024-03-12 03:26:51

पिंपरी | उद्यानात धूम्रपान, अस्वच्छता करणार्‍यांवर कारवाई करा

पाकिस्तानमध्ये महिलांमधील धुम्रपणाचे प्रमाण अचानक वाढल्यामुळे वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केली चिंता

2023-07-24 22:20:16

पाकिस्तानमध्ये महिलांमधील धुम्रपणाचे प्रमाण अचानक वाढल्यामुळे वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केली चिंता

पाकिस्तानी महिलांचे कारनामे पाहून बसेल धक्का, ७२ टक्के महिला करतात 'हे' काम

2023-07-24 12:31:43

पाकिस्तानी महिलांचे कारनामे पाहून बसेल धक्का, ७२ टक्के महिला करतात 'हे' काम

विमानात धुम्रपान अन् दरवाजा उघडण्याचा प्रयत्न; क्रू मेंबर्सनी प्रवाशाचे हात-पाय बांधून आणले मुंबईत, प्रवाशावर गुन्हा दाखल

2023-03-12 12:49:14

विमानात धुम्रपान अन् दरवाजा उघडण्याचा प्रयत्न; क्रू मेंबर्सनी प्रवाशाचे हात-पाय बांधून आणले मुंबईत, प्रवाशावर गुन्हा दाखल