Eknath Shinde | माजी आरोग्य मंत्री दीपक सावंत यांना कोल्हापूर विद्यापीठाच्या वतीने पीएचडी प्रदान करण्यात आली. यानिमित्ताने यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानतर्फे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात भाषण करताना एकनाथ शिंदे यांनी हे मोठं विधान केले आहे. यावेळी दीपक सावंत यांचे कौतुक केले. तसेच उद्धव ठाकरेंवर देखील हल्लाबोल केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दीपक सावंत यांचे कौतुक करताना सांगितले की, ‘दीपक सावंत यांचा प्रवास सर्वांनी पाहिला आहे. ते एक विश्वासू कार्यकर्ता आहेत. सोबत कोणी असेल तर मार्गदर्शन चांगलं होतं आणि अशी पदवीधर माणसं मिळतात. राज्यात सर्व सामान्य माणसाचं हे सरकार स्थापन झाले. “दीपक सावंतांनी आरोग्य विभागात चांगलं काम केलं. त्याच्या रूपाने एक दूरदृष्टी असलेला डॉक्टर शिवसेनामध्ये आहे याचा मला अभिमान आहे. कोविड काळात काय होणार कोणालाच माहीत नव्हतं. पण दीपक सावंतांनी चांगले काम केले. काही लोकांना माहीत नसेल मला देखील अर्ध्यातून शिक्षण सोडावं लागलं. बीए झालो मग फायनल करायला गेलो. २०२२ मध्ये ही परीक्षा सुरू झाली आणि ते राहून गेलं,” असेही शिंदेंनी सांगितले. “कोणाचा मानेचा पट्टा तर कोणाचा कमरेचा पट्टा सरळ केला” एकनाथ शिंदे यांनी दीपक सावंताबद्दल बोलताना उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. “तुम्हाला ही काही लोकांनी हलक्यात घेतलं. तसंच मला ही काही लोकांनी हलक्यात घेतलं होतं. तसा मी काही हलक्यात घेण्यासारखा नव्हतो. मी जरी डॉक्टर नसलो तरी मोठ मोठी ऑपरेशन केली आहेत. कोणाचा मानेचा पट्टा तर कोणाचा कमरेचा पट्टा सरळ केला आहे,” असे म्हणत शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला. हेही वाचा: महाराष्ट्र हादरला…! शाळेतील कर्मचाऱ्याकडून तब्बल १० विद्यार्थीनींचा विनयभंग