Anupam Kher post : ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेते अनुपम खेर यांनी आपल्या चार दशकांहून अधिक काळाच्या अभिनय प्रवासाविषयी एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. 540 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलेल्या अनुपम खेर यांना 1984 साली प्रदर्शित झालेल्या सारांश या चित्रपटातून मोठी लोकप्रियता मिळाली. विशेष म्हणजे, त्यांनी अवघ्या 28 व्या वर्षी एका वृद्ध वडिलांची भूमिका साकारत प्रेक्षकांची मने जिंकली होती. त्यांच्या या योगदानासाठी त्यांना पद्मश्री (2004) आणि पद्मभूषण (2016) मध्ये पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोसोबत अनुपम खेर यांनी लिहिले की, “हा असा चेहरा आहे ज्याने आयुष्य पूर्णपणे जगले आहे. मी 55 वर्षांहून अधिक काळ अभिनय करत आहे आणि त्यातील 50 वर्षांहून अधिक काळ व्यावसायिक अभिनेता म्हणून घालवला आहे.” ते पुढे म्हणाले की, या दीर्घ प्रवासात केवळ अभिनयच नाही, तर चेहराही बदलत जातो. “एका अभिनेत्याचा चेहरा हा केवळ चेहरा राहत नाही, तर तो अनुभवांचा खजिना बनतो. चेहऱ्यावरील छोट्यात छोटा हावभावही खूप काही सांगून जातो,” असे त्यांनी पोस्टमध्ये नमूद केले आहे. View this post on Instagram A post shared by Anupam Kher (@anupampkher) अनुपम खेर यांनी पुढे सांगितले की, कलाकाराच्या आयुष्यातील अनुभव, भेटलेली माणसं आणि साकारलेली पात्रं हळूहळू चेहऱ्यावर उमटत जातात. “हे सर्व अनुभव नकळत तुमच्या चेहऱ्यावर स्थिरावतात,” अशा भावनिक शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. दरम्यान, अनुपम खेर लवकरच खोसला का घोसला 2 या बहुप्रतिक्षित चित्रपटात दिसणार आहेत. हा चित्रपट 28 ऑगस्ट 2026 रोजी प्रदर्शित होणार असून, त्यांच्यासोबत बोमन इराणी, रणवीर शौरी आणि परवीन डबास हे कलाकारही स्क्रिन शेअर करताना पाहायला मिळणा्र आहेत. हेही वाचा : Tara Sutaria : तारा सुतारिया पुन्हा एकदा प्रेमात? ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्यासोबत रंगल्या डेटिंगच्या चर्चा