-->

“हक्काचे पैसे सुद्धा भीक मागून घ्यावे लागतात’; मंदार देवस्थळींनवर अभिनेत्रीचा गंभीर आरोप

'होणार सून…' फेम मंदार देवस्थळीने थकवले कलाकारांचे पैसे

मुंबई – मराठी अभिनेत्री आणि बिग बॉस फेम ‘शर्मिष्ठा राऊत’ हिने सोशल मीडियाचा आधार घेत प्रसिद्ध निर्माता मंदार देवस्थळी यांच्यावर पैसे बुडवल्याचा गंभीर आरोप केला आहे. शर्मिष्ठा राऊतच्या ह्या पोस्टमुळे मराठी चित्रपटसृष्टीत आणि सोशलवर चर्चेला चांगलेच उधाण आले आहे.

चॅनेलकडून पैसे देण्यात येत असतानाही ते पैसे तंत्रज्ञ आणि कलाकारांपर्यंत निर्मात्यांनी पोहोचवले नाहीत, असं म्हणत शर्मिष्ठाने आपल्या बरोबर घडलेल्या प्रसंगाला वाचा फोडली आहे. शर्मिष्ठा सध्या कलर्स मराठीवरील ‘हे मन बावरे’ या मालिकेत काम करत असून या मालिकेत काम केल्याचे पैसे मंदार देवस्थळींनी थकवल्याचं तिने म्हटलं.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sharmishtha Raut (@sharmishtharaut)

काय म्हणाली शर्मिष्ठा आपल्या पोस्ट मध्ये…

“गेली १३ वर्ष कलाक्षेत्रात काम करतेय.. आजपर्यंत कोणत्याही निर्मात्याने पैसे बुडवले नाहीत.. आजही आणि यापूर्वी पण कायम channel ने आम्हाला मदत केली.. परंतु एक प्रसिद्ध निर्माता, मंदार देवस्थळी त्याने सर्व कलाकार आणि तंत्रज्ञ ह्यांचे पैसे थकवले… हे कोणत्याही क्षेत्रात होऊ शकत! प्लिज घाबरू नका.. बोला..please support & Pray for US.. #support #चळवळ ‘ या आशयाची पोस्ट तिने  केली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.