Maharashtra Politics : ठाकरेंची धाकधूक वाढली! राऊतांच्या शेजारी बसलेला ‘तो’ खासदारही शिंदेंच्या संपर्कात?
Maharashtra Politics : महाराष्ट्राच्या राजकारणात कथित ‘ऑपरेशन टायगर’ची चर्चा आणखी तीव्र झाली आहे.

Maharashtra Politics : महाराष्ट्राच्या राजकारणात कथित ‘ऑपरेशन टायगर’ची चर्चा आणखी तीव्र झाली आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटातील खासदारांच्या संभाव्य बंडाबाबत विविध दावे आणि प्रतिदावे सुरू असतानाच आता आणखी एक मोठी माहिती समोर आली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेत त्यांच्या शेजारी बसलेला एक खासदारही काही महिन्यांपूर्वी शिंदे गटात जाण्यास तयार झाला होता. मात्र, शेवटच्या क्षणी ही घडामोड थांबली होती. (Maharashtra Politics)
तीन महिन्यांपूर्वीच झाली होती तयारी? (Maharashtra Politics)
सूत्रांच्या दाव्यानुसार, सुमारे तीन महिन्यांपूर्वी झालेल्या एका गोपनीय बैठकीत संबंधित खासदाराने शिंदे गटात जाण्याची तयारी दर्शवली होती. त्यावेळी कथित ‘ऑपरेशन टायगर’ राबवण्याची संपूर्ण रणनीती आखण्यात आली होती. मात्र, ऐनवेळी काही अडथळे निर्माण झाल्याने हा प्रयत्न पुढे ढकलण्यात आल्याचे सांगितले जात आहे. (Maharashtra Politics)
त्यानंतर अलीकडे काही खासदार दिल्लीकडे रवाना झाल्याच्या चर्चांदरम्यानही संबंधित खासदाराने त्यांच्यासोबत जाण्यास नकार दिला. यानंतर त्यांनी संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेत सहभागी होत ठाकरे गटाची भूमिका मांडली. (Maharashtra Politics)
सातव्या खासदाराबाबतही चर्चा (Maharashtra Politics)
सूत्रांच्या माहितीनुसार, सध्या सुरू असलेल्या घडामोडी हा केवळ पहिला टप्पा असून, येत्या दोन महिन्यांत आणखी एका खासदाराच्या भूमिकेत बदल होऊ शकतो. ठाकरे गटातील आणखी काही खासदारांशी संपर्क सुरू असल्याचा दावाही केला जात आहे. मात्र, याबाबत कोणतीही अधिकृत पुष्टी झालेली नाही. (Maharashtra Politics)
ऑपरेशन टायगर पुन्हा चर्चेत
सूत्रांच्या माहितीनुसार, यापूर्वीच्या हालचालीदरम्यान संभाव्य पक्षांतरासाठी आवश्यक तयारीही करण्यात आली होती. मात्र, शेवटच्या क्षणी परिस्थिती बदलल्याने ती मोहीम पुढे सरकली नाही. आता पुन्हा दिल्लीतील बैठका आणि वाढलेल्या राजकीय हालचालींमुळे ‘ऑपरेशन टायगर’ पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहे. (Maharashtra Politics)
दरम्यान, या सर्व घडामोडींवर ठाकरे गटाने कोणतीही फूट पडणार नसल्याचा दावा कायम ठेवला आहे. दुसरीकडे, शिंदे गटाकडूनही या चर्चांवर अधिकृत भूमिका स्पष्ट करण्यात आलेली नाही. त्यामुळे पुढील काही दिवसांत महाराष्ट्राच्या राजकारणात नेमक्या कोणत्या घडामोडी घडतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (Maharashtra Politics)






