Poonam Pandey : “आमचे पॅड्स सुद्धा 370 रुपयांपेक्षा..”; पूनम पांडे प्रचंड संतापली, प्रणित मोरेला सुनावले खडेबोल
Poonam Pandey : आता या वादावर अभिनेत्री आणि मॉडेल पूनम पांडे हिने संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.

Poonam Pandey : स्टँड-अप कॉमेडियन आणि ‘बिग बॉस 19’मुळे चर्चेत आलेला प्रणित मोरे सध्या त्याच्या शोमधील वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. शोदरम्यान प्रेक्षक गॅलरीत उपस्थित असलेल्या हिमांशु जांगडा याने महिलांबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर मोठा वाद निर्माण झाला आहे. या प्रकरणामुळे प्रणित मोरे आणि त्याच्या शोच्या स्वरूपावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये हिमांशु जांगडा महिलेबाबत आक्षेपार्ह टिप्पणी करताना दिसतो. मात्र, त्याला थांबवण्याऐवजी शोचा होस्ट प्रणित मोरे आणि उपस्थित प्रेक्षक हसताना दिसल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. ‘370 रुपयांच्या बिर्याणी’शी संबंधित हा जोक सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चेचा विषय ठरला असून, यातून महिलांविषयी अत्यंत हीन दर्जाचे वक्तव्य केल्याने चांगलाच वाद निर्माण झाला आहे.
आता या वादावर अभिनेत्री आणि मॉडेल पूनम पांडे हिने संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. तिने इन्स्टाग्रामवर व्हिडिओ शेअर करत हिमांशु जांगडाच्या वक्तव्यावर जोरदार टीका करत संताप व्यक्त केला आहे. महिलांबद्दल बोलताना जबाबदारीची जाणीव ठेवण्याचा सल्ला देत तिने अशा विधानांचा तीव्र शब्दांत निषेध नोंदवला.
हेही वाचा : NCP Merge into Congress : सर्वात मोठी बातमी! शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार? हालचालींना वेग
पूनम पांडे काय म्हणाली? (Poonam Pandey)

Poonam Pandey : “आमचे पॅड्स सुद्धा 370 रुपयांपेक्षा..”; पूनम पांडे प्रचंड संतापली, प्रणित मोरेला सुनावले खडेबोल
“भाई,काय चाललय मार्केटमध्ये..मी 370 रुपये बिर्याणीची स्टोरी ऐकली. वाह बेटा काय विचार करतोस तू. मी तुला एक गोष्ट सांगीन, आम्हा महिलांना दर महिन्याला पीरियड्स येतात. त्यासाठी आम्ही पॅड्स वापरतो. आमचे पीरियड्सचे पॅड्स सुद्धा 370 रुपयापेक्षा महाग असतात. ते आम्ही वापरुन फेकून देतो. तोंड सांभाळून बोल. तू स्त्रिया बद्दल बोलतो आहेस हे लक्षात ठेवं” असं तिने व्हिडिओमध्ये म्हटलं आहे.
‘त्या’ डॅाक्टर तरुणीने मागितली माफी (Poonam Pandey)
दरम्यान, या शोमधील आणखी एका व्हिडिओमुळेही चर्चा रंगली आहे. शोमध्ये सहभागी झालेल्या एका तरुणीने मृतदेह आणि त्याच्या अवयवांबाबत केलेल्या विनोदी टिप्पणीवरून सोशल मीडियावर टीकेची झोड उठली आहे. संबंधित तरुणी डॉक्टर असल्याचे सांगण्यात येत असून, या प्रकरणातही शोचा होस्ट म्हणून प्रणित मोरेने तिला प्रोत्साहन दिल्याचा आरोप काही नेटकऱ्यांनी केला आहे. संबंधित डॅाक्टर तरुणीने सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर जाहीर माफी मागितली आहे.
सोशल मीडियावर सुरू असलेल्या तीव्र प्रतिक्रियांदरम्यान हिमांशु जांगडाला त्याच्या नोकरीवरून काढून टाकल्याची माहिती समोर आली आहे. या संपूर्ण प्रकरणामुळे स्टँड-अप कॉमेडीमधील अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि सामाजिक जबाबदारी यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
हेही वाचा : Black Pepper: उन्हाळ्यात काळी मिरी खावी की टाळावी? जाणून घ्या फायदे आणि तोटे





