Muncipal Corporation Election 2026 | राज्यातील २९ महापालिकांसाठी गुरुवार १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान होणार आहे. त्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी १६ जानेवारीला मतमोजणी पार पडणार आहे. परंतु, मतदान करण्यासाठी ज्या मतदारांचे यादीत नाव आहे, अशा मतदारांसाठी ओळखपत्र दाखवणे अनिवार्य असणार आहे. मात्र, एखाद्या पात्र मतदाराकडे मतदार छायाचित्र ओळखपत्र नसल्यास त्या व्यक्तीला राज्य निवडणूक आयोगाने मतदार छायाचित्र ओळखपत्र व्यतिरिक्त इतर 12 प्रकारचे ओळखपत्र पुरावे म्हणून ग्राह्य धरले जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे. येत्या १५ जानेवारीला सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत मतदान होणार आहे. या निवडणुकीत मतदान करण्यासाठी पात्र मतदाराने मतदान केंद्रावर स्वतःची ओळख पटविण्यासाठी छायाचित्र असलेले मतदार ओळखपत्र सादर करावे. परंतु, ज्यांच्याकडे छायाचित्र असलेले मतदार ओळखपत्र नसेल, अशा मतदारांना ओळख पटविण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या १२पैकी कोणताही एक पुरावा सादर करावा लागेल, अशी माहिती मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी दिली. त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या अन्य १२ प्रकारच्या ओळखीच्या पुराव्यांपैकी कोणताही एक पुरावा दाखविल्यानंतर मतदान करता येणार आहे. फक्त वोटर स्लीपच्या आधारे मतदान करता येणार नाही. वोटर स्लीपसोबत देखील खालीलपैकी एक ओळखपत्र आवश्यक आहे. Muncipal Corporation Election 2026 | मतदार ओळखपत्र नसल्यास कोणते पुरावे धरले जाणार ग्राह्य? आधार ओळखपत्र पासपोर्ट वाहन चालविण्याचा परवाना पॅन कार्ड राष्ट्रीयीकृत बँका किंवा टपाल खात्यामधील खातेदाराचे छायाचित्र असलेले पासबुक सक्षम प्राधिकाऱ्याने छायाचित्रासह दिलेला दिव्यांग (अपंगत्वाचा) दाखला राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेखालील छायाचित्र असलेले ओळखपत्र (मनरेगा जॉब कार्ड) निवृत्त कर्मचाऱ्यांची अथवा त्यांच्या विधवा, अवलंबित व्यक्तींची फोटो असलेली निवृत्तीवेतनविषयक कागदपत्रे (उदा. पासबुक, प्रमाणपत्र इ.) लोकसभा, राज्यसभा सचिवालय तसेच विधानसभा, विधान परिषद सचिवालय यांनी आपल्या सदस्यांना दिलेले अधिकृत ओळखपत्र स्वातंत्र्यसैनिकाचे छायाचित्र असलेले ओळखपत्र केंद्र शासनाच्या श्रम मंत्रालयाने दिलेले आरोग्य विमा योजनेचे छायाचित्रासह कार्ड केंद्र शासन, राज्य शासन, सार्वजनिक उपक्रम, स्थानिक स्वराज्य संस्था यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना छायाचित्रासह दिलेली ओळखपत्रे. हेही वाचा: आजपासून बदलणार पंतप्रधानांच्या नवीन कार्यालयाचा पत्ता ; जाणून घ्या काय आहे वैशिष्ट्ये?