Maratha Protest : मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे यासह इतर मागण्यांसाठी मुंबईच्या आझाद मैदानात आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनसाठी हजारो आंदोलक मुंबई दाखल झाले आहेत. मात्र काही आंदोलनकर्त्यांनी धुडगूस घातल्याने मुंबईकरांची मोठ्या प्रमाणात गैरसोय झाल्याचे पाहायला मिळालं. या आंदोलनाविरोधात हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावरील सुनावणीत आज सलग दुसऱ्या दिवशी देखील घेण्यात आली. यादरम्यान, मुंबई हायकोर्टाने ३ वाजेपर्यंत मुंबई रिकामी करा असा आदेश दिला आहे. दुपारी ३ पर्यंत आझाद मैदान रिकामे करण्याचे निर्देश मुंबई हायकोर्टाने दिले असले तरी आझाद मैदान सोडणार नसल्याची ठाम भूमिका मराठा आंदोलकांनी घेतली आहे. राज्य सरकारने परिस्थिती नियंत्रणात आणावी, अशी स्पष्ट भूमिका न्यायालयाने मांडली आहे. यानंतर आझाद मैदानावरील आंदोलकांनी ठाम भूमिका घेत आम्हाला गोळ्या घातल्या तरी आम्ही मागे हटणार नाही, असा पवित्रा आंदोलकांनी घेतला आहे. त्यामुळे आता पुढील सुनावणीत कोर्ट काय निर्णय घेणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत आम्ही एक इंचही हटणार नाही जोपर्यंत आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत आम्ही एक इंच देखील इथून हटणार नाही. जोपर्यंत आमचे मनोज दादा इथे बसलेले आहे. तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही. तीन वाजो, पाच वाजो, कितीही दिवस लागो, जोपर्यंत आमचे दादा इथे आहे तोपर्यंत मराठा बांधव मुंबईतून हटणार नाही. आम्हाला गोळ्या घातल्या तरीही आम्ही हटणार नाही. आम्हाला आरक्षण द्या, आम्ही आमच्या गावी जातो, असं मराठा आंदोलकांनी म्हटले आहे. कोर्टाच्या आजच्या सुनावणीतील 5 मोठे मुद्दे 1) तीन वाजेपर्यंत मुंबईतील परिस्थिती सुरळीत करा, राज्य सरकार आणि आंदोलकांना निर्देश. 2) सरकारच्या भूमिकेने संतुष्ट नाही- कोर्ट 3) मराठा आंदोलकांनी कोर्टाला घेराव घालणं योग्य नाही. 4) आंदोलकांकडे परवानगी नाही तर तात्काळ आझाद मैदान खाली करावं, जागा अडवू शकत नाहीत. 5) तीनपर्यंत कार्यवाही झाली नाही तर कोर्ट स्वत: रस्त्यावर उतरून आढावा घेणार. मराठा आंदोलकांनी कोर्टात काय भूमिका मांडली? 1) आंदोलकांकडून जर त्रास झाला असेल तर माफी मागतो, पण आंदोलकांची कोणतीही सोय झाली नाही. २) 5 हजार आंदोलनकर्त्यांना परवानगी दिली पण 500 लोकांच्या पार्किंगचीही सोय केली नाही. ३) मीडियाच्या माध्यमातून अतिरिक्त गर्दी वाढल्याची माहिती आंदोलकांना दिली. ४) आम्ही शांत आहोत आम्ही कायद्याचं पालन करतोय.