Govind Mokate : निकालाचे चित्र स्पष्ट होण्याआधीच शरद पवार गटाच्या उमेदवाराचा मोठा दावा म्हणाले…
Govind Mokate : या निवडणुकीचा निकाल जाहीर होण्याआधीच शरद पवार गटाचे उमेदवार गोविंद मोकाटे यांनी मोठा दावा केला आहे.

Govind Mokate : आज अवघ्या देशाचे लक्ष पाच राज्यांच्या निवडणुकीच्या निकालाकडे लागलेले आहे. आज सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरूवात झाली असून, पहिले कल समोर आले आहेत.
या निवडणुकीच्या निकालासोबत महाराष्ट्रातील बारामती आणि राहुरी या दोन अत्यंत महत्वाच्या पोटनिवडणुकीचा निकालही जाहीर होणार आहे. त्यामुळे महाराष्ट्राचे लक्ष याकडे लागलेले आहे.
या निवडणुकीचा निकाल जाहीर होण्याआधीच शरद पवार गटाचे उमेदवार गोविंद मोकाटे यांनी मोठा दावा केला आहे. मला विश्वास आहे कारण प्रचारनंतर मी कार्यकर्त्यांची आढावा बैठक घेतली असून १०० टक्के निवडून येईल, असा मोठा दावा त्यांनी केला आहे.
एका वृत्तवाहिनीसोबत बोलताना त्यांनी हा दावा केला आहे. तसेच शेतकऱ्यांच्या मनात चीड असून ते भाजपला मतदान करणार नाहीत. २० ते २५ हजार मताधिक्काने निवडून येईल, असेही त्यांनी म्हटले आहेत.
दरम्यान, आज सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली असून, प्रथम टपाली मतमोजणीला सुरुवात झाली आहे. या मतमोजणीत भाजप उमेदवार अक्षय कर्डिले आघाडीवर आहेत.
भाजपचे दिवंगत आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनामुळे राहुरीची जागा रिक्त झाली होती. या पार्श्वभूमीवर येथे २३ एप्रिल रोजी मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
बारामतीत सुनेत्रा पवारांची आघाडी
बारामतीत पहिल्या फेरीनंतर सुनेत्रा पवार साडे सहा हजार मतांनी आघाडीवर आहेत.





