वयाच्या 85 व्या वर्षीही हेलन यांचं जिममध्ये वर्कआऊट ‘व्हायरल’

Entertainment । जेष्ठ अभिनेत्री हेलन या 70 आणि 80 च्या दशकातील बॉलीवूडमधील अतुलनीय कलाकारांपैकी एक आहे, त्या काळात आकर्षक चाल, ऑन पॉइंट अभिनय आणि सौंदर्याने लाखो चाहत्यांची मने हेलन यांनी जिंकली. ‘डॉन’ मधील ‘ये मेरा दिल’, ‘कारवां’ मधील ‘पिया तू अब तो आजा’, ‘शोले’ मधील ‘मेहबूबा मेहबूबा’ आणि इतर अनेक सदाबहार गाणे आजही सर्वांच्या लक्षात राहतात.
View this post on Instagram
अशातच हेलन यांचा एक व्हिडिओ समोर आला आहे. 85 वर्षीय हेलन या जीममध्ये डान्स करत व्यायाम करत आहे. या व्हिडिओवर संमिश्र प्रतिक्रिया येत आहे. या व्हिडिओवर एकाने लिहिले आहे की,’वय फक्त एक संख्या आहे.’ व्हिडिओ क्लिपमध्ये, हेलन प्रशिक्षकाच्या देखरेखीखाली अनेक पायलेट्स व्यायाम करताना दिसत आहे
या व्हिडिओत हेलन सांगतात, “आधी मी काठी घेऊन चालायचे. आता ती काठी कपाटात कुठेतरी ठेवली आहे. मला गुडघेदुखीचा त्रास होता. त्यासाठी मी इंजेक्शन घ्यायचे. आता तो त्रास पूर्णपणे बरा झाला आहे. मी आता आपणहून चालू शकते कदाचित डान्सही करु शकेन. इंडस्ट्रीतील सर्व डान्सर्सना सांगेन तुम्ही आता जा कुठेतरी कारण मी परत येतीये. Pilates मुळे मला खूप उत्साही वाटतंय, खूप आनंदी वाटतंय. नशेसाठी मला सिगारेट, दारुची गरज नाही. Pilates मुळेच मला HIGH वाटतंय.”
दरम्यान हेलन यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे तर, हेलन या सलीम खानसोबत लग्न केल्यामुळे चर्चेत असतात.





