60 व्या वर्षीही इतका आकर्षक दिसतो! ‘या’ हॅालिवूड चित्रपटाच करिनाने केलं भरभरून कौतुक म्हणाली…

Kareena Kapoor : बॅालीवूड इंडस्ट्रीमधील लोकप्रिय अभिनेत्री करिना कपूर नेहमी तिच्या वेगळ्या स्टाईने परिचित आहे. करिना चित्रपटांसोबतच अनेक मोठ्या ब्रँन्डच्या प्रोडक्टच्या जाहिरातही करत असते. तिचा ग्लॅमरस लूक नेहमी काळजाचा ठोका चुकवणारा असतो. करिना हि हॅालिवूडची चित्रपटांची खूप मोठी चाहती आहे. नुकताच तिने एक हॅालिवूड चित्रपट पाहिला असून या चित्रपटाचे नाव F1 असे आहे. करिनाने चित्रपटाचे कौतुक करणारी स्टोरी इन्स्टाग्रामवरून शेअर केली आहे.
इंस्टाग्राम स्टोरीवर करिना कपूरने ब्रॅड पिटच्या नवीन चित्रपट F1 चे कौतुक केले आहे. यासोबतच करिनाने ब्रॅड पिटच्या लूकचीही प्रशंसा केली आहे. करिनाने ब्रॅड पिटच्या चित्रपटाचा एक खास फोटो शेअर केला आहे. या फोटोला तिने लक्षवेधक कॅप्शन दिले आहे. “ब्रॅड 60 व्या वर्षीही इतका आकर्षक दिसतो, कोण 20 वर्षांचा होऊ इच्छित असेल?” “F1”
F1 हा जोसेफ कोसिन्स्की दिग्दर्शित एक रेसिंग ड्रामा चित्रपट आहे. या चित्रपटात ब्रॅड पिटने सोनी हेसची भूमिका साकारलेली आहे, जो 30 वर्षांनंतर फॉर्म्युला वन रेसिंगमध्ये परततो. एका अपघातामुळे सोनीची कारकीर्द संपते, पण त्याचा मित्र रुबेन (जेव्हियर बार्डेम) त्याला त्याच्या F1 संघात परत आणतो, अशी सर्वसाधारण चित्रपटाची कथा आहे.
या चित्रपटात डॅमसन इद्रिस, केरी कॉन्डन यांच्याही विशेष भूमिका आहेत. करिना कपूर दिग्दर्शिका मेघना गुलजार यांच्या ‘दायरा’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात करिना कपूरसोबत पृथ्वीराज सुकुमारन देखील मुख्य भूमिकेत आहे. हा एक क्राइम-ड्रामा थ्रिलर आहे आणि त्यात सामाजिक विषय अधोरिखेत करण्यात आला आहे.
हेही वाचा : ‘ठाकरे बंधूं’च्या विजयी मेळाव्या अगोदर भाजप नेत्याच मोठं विधान





