पुणे | वारीनिमित्त “दुर्घटना प्रतिसाद पथक’ स्थापन

पुणे , {प्रभात वृत्तसेवा} – आषाढी पालखी सोहळा सुरळीत पार पाडण्यासाठी जिल्हास्तरावर नियोजन करण्यात येत आहे. यापार्श्वभूमीवर प्रशासनाकडून “दुर्घटना प्रतिसाद पथक’ स्थापन करण्यात आले आहे.
या पथकाचे प्रमुख खेड, पिंपरी चिंचवड, पुणे शहर, हवेली, पुरंदर, बारामती, इंदापूर आणि दौंड, या तालुक्यांतील उपविभागीय अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
दुर्घटना प्रतिसाद पथकाच्या प्रमुख आणि उपप्रमुखांची कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी उपस्थितांना प्रात्यक्षिकाद्वारे सूचना करण्यात आल्या असून गर्दीच्या काळात दूर्घटना होऊ नये म्हणून किंवा दुर्घटना घडल्यास कोणत्या प्रकारे यंत्रणेकडून काम करून घ्यायचे, परस्पर समन्वय ठेवणे आदींबाबत प्रशिक्षण देण्यात आले.
या पथकाची संपूर्ण नियमावली तयार करण्यात आली असून दोन्ही पालख्या जोपर्यंत संबंधित तालुक्यांमधून हद्दीपर्यंतची संपूर्ण जबाबदारी नियोजन याबाबत जबाबदारी पथक प्रमुखांना देण्यात आले आहे,
तर त्यांच्या मदतीसाठी संबंधित तालुक्यातील महसूल विभाग, पोलीस, पंचायत समिती, सार्वजनिक बांधकाम विभाग, विद्युत विभाग, अन्न व औषध प्रशासन, दूरसंचार आदी विभागातील अधिकारी आणि कर्मचारी यांच्या नियुक्त्या करून प्रत्यक्ष कामाच्या जबाबदाऱ्या वाटून देण्यात आल्या आहेत.





