Esha Deol : ईशा देओलचे कमबॅक! ‘मालामाल वीकली २’ मध्ये करणार एन्ट्री
Esha Deol : 'मालामाल वीकली २'च्या शूटिंगला नोव्हेंबर २०२६ पासून सुरुवात होऊ शकते

Esha Deol : बॉलिवूड अभिनेत्री ईशा देओल पुन्हा एकदा पुन्हा मनोरंजन विश्वात कमबॅक करण्यासाठी सज्ज झाली आहे. बॉलिवूड हंगामाच्या रिपोर्टनुसार, ईशा देओलने ‘मालामाल वीकली २’ हा सिनेमा साइन केला आहे. ईशा व्यतिरिक्त ‘बिग बॉस १७’ ची स्पर्धक आणि अभिनेत्री सोनिया बन्सलने देखील या चित्रपटात दिसणार आहे.
सिनेमाच्या निर्मात्यांनी सोनियाला एका रंजक भूमिकेची ऑफर दिली. ही भूमिका आवडल्यामुळे सोनियानेही या प्रोजेक्टमध्ये काम करण्यास होकार दिला आहे.
रिपोर्ट्सनुसार, ‘मालामाल वीकली २’च्या शूटिंगला नोव्हेंबर २०२६ पासून सुरुवात होऊ शकते. या सिनेमाची कथा पहिल्या भागापेक्षा वेगळी असेल, मात्र सिनेमाचा मूळ विनोदी अंदाज कायम ठेवण्यात येणार आहे. सिनेमात एका छोट्या शहराची कथा दाखवली जाणार आहे.
‘मालामाल वीकली २’चे दिग्दर्शन ‘तेरी बातों में ऐसा उलझा जिया’चे दिग्दर्शक अमित जोशी करत आहेत. याआधी वृत्त आले होते की, या चित्रपटात रवीना टंडन आणि परिणीती चोप्रासारख्या अभिनेत्रीही दिसणार आहेत. याशिवाय, अभिनेत्री शिल्पा शिरोडकर, अभिनेते राजपाल यादव आणि एल्विश यादव देखील चित्रपटात असल्याची चर्चा आहे.
दरम्यान, २००६ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘मालामाल वीकली’ सिनेमात दिवंगत अभिनेते ओम पुरी यांच्यासोबत परेश रावल, रितेश देशमुख आणि राजपाल यादव यांसारखे कलाकार महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसले होते. आता या लोकप्रिय कॉमेडी फ्रँचायझीच्या दुसऱ्या भागात ईशा देओल आणि सोनिया बन्सल यांची एन्ट्री होणार आहे.
ईशा शेवटची ‘रुद्र: द एज ऑफ डार्कनेस’ या वेब सीरिजमध्ये दिसली होती. ही सीरिज २०२२ मध्ये जिओ हॉटस्टारवर प्रदर्शित झाली होती. यानंतर आता ती नव्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
हेही वाचा :






