घटस्फोटानंतर ईशा देओल आणि भरत पुन्हा एकत्र? व्हिडिओमुळे चर्चांना उधाण

Esha Deol And Ex Husband Bharat Takhtani | अभिनेत्री ईशा देओल पुन्हा एकदा तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. सोशल मीडियावर ईशाचा मुंबई विमानतळावरील एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यात ती पूर्व पती भरत तख्तानी याच्यासोबत स्पॉट झाली. घटस्फोटानंतर ईशा आणि भरत पहिल्यांदा एकत्र स्पॉट झाले आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.
ईशा देओल आणि भरत तख्तानी यांनी 2024 मध्ये घटस्फोटाची अधिकृत घोषणा केली आहे. घटस्फोटानंतर पहिल्यांदा एकत्र आल्यामुळे दोघांना कॅमेऱ्यात कैद करण्यात आहे. व्हिडिओमध्ये आधी भरत गाडीतून बाहेर येतो, त्याच्या मागोमाग ईशा देखील बाहेर येते आणि पापाराझींशी बोलण्यात गुंतते.
यावेळी भरत मीडियापासून अंतर राखत पळ काढतो. ईशा काही क्षणांनंतर भरतसोबत विमानतळाच्या आत जाते. दोघांना एकत्र पाहून सर्वजण आश्चर्यचकित झाले. सध्या दोघांचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
View this post on Instagram
घटस्फोटानंतर ईशाने एका मुलाखतीत खासगी आयुष्याबद्दल मोठा खुलासा केलेला. “आयुष्यात प्रत्येक दिवस सारखा नसतो. परिस्थिती बदलत असते. जर दोन लोकांमधील नातं चांगलं नसेल, विशेष करून मुलं झाल्यानंतर, तर गरजेचं नाही एकत्र राहिलंच पाहिजे. दोघांनी मिळून नव्या मार्गाचा विचार केला तर मुलांना चांगले संस्कार देता येतील आणि आम्ही तेच करत आहोत.” मात्र आता घटस्फोटानंतर दोघे एकत्र दिसल्याने चर्चांना उधाण आले आहे.
हेही वाचा:
UPI पेमेंटपासून तात्काळ ट्रेन तिकिटापर्यंत…; 1 जुलैपासून होणार ‘या’ नियमांमध्ये बदल





