धार्मिक उत्सवाच्या होर्डिंगवर मिया खलिफाचा फोटो पाहून लोक संतापले; पोलिसांनी केली कारवाई

जेव्हा मंदिरात किंवा कोणत्याही धार्मिक स्थळी कोणताही कार्यक्रम आयोजित केला जातो. त्यावेळी धर्माशी संबंधित आदरणीय व्यक्तींचे फोटो तिथे लावले जातात. धार्मिक श्रद्धा असलेल्या लोकांची फोटो लावली जातात. मात्र तामिळनाडूमध्ये एका पार्वती मंदिरात धार्मिक कार्यक्रमासाठी लावण्यात आलेले पोस्टर चांगलेच चर्चेत आले आहे.
मंदिराच्या बाहेरील धार्मिक कार्यक्रमाच्या फोटोमध्ये पॉर्न स्टार मिया खलिफाचे पोस्टर लावण्यात आले. ही बाब सुरुवातीला कोणाच्याच लक्षात आली नाही. मात्र नंतर हा प्रकार स्थानिकांच्या लक्षात येताच त्यांनी पोलिसांना माहिती दिली. हे संपूर्ण प्रकरण सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे.
Kuruvimalai, Tamil Nadu: An image of Mia Khalifa was used on a hoarding for the Aadi Perukku festival carrying a traditional milk vessel. Magaral Police Station removed the hoarding pic.twitter.com/xYRcuJqIOb
— IANS (@ians_india) August 8, 2024
धार्मिक कार्यक्रमात मियां खलिफाचे पोस्टर
मिया खलिफा एक एक्स-एडल्ट पॉर्न स्टार आहे. तामिळनाडूतील कांचीपुरम भागात एका धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मंदिरात आडी उत्सवादरम्यान देवी अम्मान म्हणजेच माता पार्वतीची पूजा केली जाते. आणि या कार्यक्रमासाठी परप्रांतीय लोकांनी मंदिराबाहेर पोस्टर लावले होते. यावेळी त्यांनी पोस्टरवर मिया खलिफाचा फोटो लावण्यामुळे परिसरातील वातावरण चांगलेच पेटले.
या पोस्टरमध्ये माता पार्वतींसोबतच परप्रांतीय लोकांच्या आधारकार्डचे फोटोही टाकण्यात आले होते.तसेच मिया खलिफाचे पोस्टरही तिथे लावण्यात आले होते. काही वेळातच हे पोस्टर सोशल मीडियावर व्हायरल झाले, पोस्टरमध्ये मियां खलिफा भगव्या कपड्यात डोक्यावर भांडे धरून दिसत आहे. हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
पोलिसांनी पोस्टर हटवले
जेव्हा हे पोस्टर सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले तेव्हा स्थानिक लोकांनी याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी तातडीने हे पोस्टर मंदिर परिसरातून हटवले. पोस्टरमध्ये मियां खलिफाचा फोटो अशा प्रकारे एडिट करण्यात आला आहे की जणू ती ‘पल कुदम’ करत आहे. ‘पल कुदम’ हे दक्षिण भारतातील दुधाने भरलेले भांडे आहे. या उत्सवात देवांना नैवेद्य दाखवला जातो. साधारणतः शिवरात्री किंवा महाशिवरात्रीला भगवान शिवाला दूध अर्पण केले जाते.





