पिंपरी | सावरोलीतील आदिवासी बांधवांचा ठाकरे गटात प्रवेश

खालापूर, (वार्ताहर) – तालुक्यातील सर्वाधिक प्रतिष्ठेच्या सावरोली ग्रामपंचायतीतील दीडशेहून अधिक आदिवासी बांधवांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला.
शिवसेनेचे उत्तर रायगड जिल्हा सल्लागार गजानन पाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत यांच्या उपस्थितीत कर्जत येथील शिवसेनेच्या मध्यवर्ती शिवालय कार्यालयात हा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम झाला.
खालापूर तालुकाप्रमुख एकनाथ पिंगळे, संपर्कप्रमुख उमेश गावंड, कर्जत तालुकाप्रमुख उत्तम कोळंबे, संघटक बाबू घारे, संपर्कप्रमुख भिवसेन बडेकर, सहसंपर्कप्रमुख अविनाश भासे, युवासेना विधानसभा अधिकारी संपत हडप, कर्जत तालुका संघटक करुणा बडेकर,
विभागप्रमुख राजेश मेहतर, गुरूदत्त घोसाळकर, लक्ष्मण पोसाटे, संचीता बारड, अंकुर बामणे, भारती लोते, पक्षाचे पदाधिकारी आणि आदिवासी समाज बांधव यावेळी उपस्थित होते.
या पक्षप्रवेशाने खालापूर तालुक्यात शिवसेना पक्षाची बांधणी मजबूत होताना पाहायला मिळत असून सर्व आदिवासी समाज बांधवांचे स्वागत आहे, असे उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत म्हणाले. तसेच पुढील काळात पक्षाच्या वतीने ताकद देत आपले प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध राहू, असे आश्वासनही त्यांनी दिले.





