दुर्गाडी किल्ल्यावर हिंदूंना प्रवेशबंदी; बकरी ईदीला दोन्ही शिवसेनेचे घंटानाद आंदोलन

Kalyan Durgadi Fort | हिंदू-मुस्लीम धर्माची प्रार्थनास्थळे कल्याणमधील दुर्गाडी किल्ल्यावर आहे. परंतु बकरी ईदनिमित्त हिंदू समुदायास किल्ल्यावर प्रार्थना करण्यास बंदी घातली आहे. त्याविरोधात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून आंदोलन करण्यात आले. यावेळी लाल चौकीजवळ मोठ्या संख्येने पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला.
दरवर्षीप्रमाणे यंदाही शिवसेनेने हे आंदोलन केले. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन वर्षानुवर्षे सुरू आहे. पोलिसांनी लालचौकी येथे बॅरिगेड्स लावून आंदोलकांना थांबवले. त्यानंतर पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले. या परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. यावेळी शिवसेनेच्या ठाकरे आणि शिंदे या दोन्ही गटांनी वेगवेगळी आंदोलने केली. Kalyan Durgadi Fort |
१९७२ पासून शिवसेनेकडून घंटानाद आंदोलन
कल्याणच्या दुर्गाडी किल्ल्यावर जाण्यासाठी दोन्ही शिवसेनेकडून आंदोलन करण्यात येते. बकरी ईदच्या दिवशी हिंदूंना दुर्गाडी किल्ल्यावर प्रार्थना करण्यास बंदी असल्याच्या निषेधार्थ शिवसेनेने घंटानाद आंदोलन केले. शिवसेनेकडून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे असताना १९७२ सालापासून या आंदोलनास सुरुवात झाली होती. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिघे यांच्या नेतृत्वाखाली याची सुरुवात झाली होती. या किल्ल्यावर मुस्लीम आणि हिंदूंची प्रार्थनास्थळ आहे. Kalyan Durgadi Fort |
बकरी ईदला मुस्लीम बांधव मोठ्या संख्येने या किल्ल्यावर येतात. या ठिकाणी नमाज अदा करतात. यामुळे हिंदूंना जाण्यास बंदी घातली गेली आहे. त्या निर्णयास विरोध करत किल्ल्यावर जाण्यासाठी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे शिवसैनिक पोहचले. परंतु लाल चौकी परिसरात पोलीस बॅरिकेड्स लावून आंदोलनकर्त्यांना थांबवले आहे.
शिवसैनिक बॅरिकेड तोडून पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु पोलिसांनी त्यांना रोखून धरले आहे. या ठिकाणी शिवसैनिक घोषणा देत आहे. देवीची आरती शिवसैनिकांकडून या ठिकाणी करण्यात येणार आहे. तसेच उद्धव ठाकरे यांचे शिवसैनिकसुद्धा या ठिकाणी आंदोलन करणार आहे. Kalyan Durgadi Fort |
शिवसेना फूटल्यानंतर दोन्ही गट दरवर्षी मोठ्या प्रमाणात दुर्गाडी किल्ल्याजवळ एकत्र येऊन मंदिरात पोहोचण्याचा प्रयत्न करतात. मात्र, मुस्लिम बांधव या दिवशी नमाज अदा करत असल्याने संभाव्य तणाव टाळण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून रस्ते बंद करून आंदोलनकर्त्यांना लाल चौकीजवळच अडवले जात आहे. Kalyan Durgadi Fort |
हेही वाचा :
Supriya Sule : विशेष अधिवेशनाच्या मागणीवर शरद पवार गटाची सही का नाही? सुप्रिया सुळेंचा स्पष्ट खुलासा





