करोना संकटात मंडळांच्या कामांचा अभिमान ! उद्योजक ओमप्रकाश रांका यांच्या भावना

प्रभात वृत्तसेवा पुणे, दि. 27 – साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या विचारांचे प्रत्येकाने अनुकरण केले पाहिजे. करोना काळात सामाजिक बांधिलकी जपून समाजात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या मंडळांचा सन्मान करताना आम्हाला सार्थ अभिमान वाटतो, अशा भावना उद्योजक ओमप्रकाश रांका यांनी व्यक्त केल्या.
करोना काळात सामाजिक बांधिलकी जपून उल्लेखनीय कामगिरी केलेल्या मंडळांचा प्रतिभा नारी परिवर्तन संस्थेच्या वतीने 102 मंडळांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आला. अखिल भारतीय मराठा महासंघाचे युवक अध्यक्ष रणजित जगताप, पोलीस अधिकारी करिष्मा शेख, सुनील मुचंड, संस्थेच्या प्रदेश अध्यक्षा अर्चना शाह- भिवरे पाटील, संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजू मोहिते, शैला मुजुमले, मंदाकिनी देशमुख, रुपाली क्षीरसागर, सोनाली वैद्य आशा उजागरे यावेळी उपस्थित होत्या.
संस्थेच्या वतीने लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची 102 वी जयंती तसेच स्वातंत्र्यांच्या अमृतमहोत्सवा निमित्ताने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यात सुमारे 200 मंडळांनी सहभाग नोंदविलेला होता. सूत्रसंचालन सुजित रणदिवे यांनी, तर आभार संस्थेच्या सचिव सिमरन सय्यद यांनी केले.





