पिंपरी | नाणे मावळात गौरी-गणपतीचा उत्साह

नाणे मावळ, (वार्ताहर) – गणरायाच्या पाठोपाठ गौराईंचे देखील आगमन झाले असून मावळ परिसरात मोठ्या उत्साहात गौरी-गणपतीचा हा सण साजरा केला जात आहे.
गणेश चतुर्थी ह्या सणाला गौराईचे उत्साहात स्वागत, वनस्पती आणि फुलांनी पारंपारिक पूजा केली जाते. गौरी मातेचे आगमन आणि तिची पूजा हा सुना आणि माय-लेकींचा अतिशय जिव्हाळ्याचा सण आहे.
गौराई सरबराई साजरी करण्यासाठी महिला भगिनी महिनाभर आधीच या सणाची तयारी करतात. मंगळवारी नाणे मावळ तालुक्याच्या ग्रामीण भागात मंगळवारी गौरी आगमन आणि बुधवारी गौरीपूजना दरम्यान महिलांमध्ये विशेष आनंदाचे वातावरण होते.
माहेरवाशिणींनी मंगळवारी मोठ्या जल्लोषात गौरी बसविल्या तर बुधवारी त्यांचे पूजन करुन नैवेद्य दाखविण्यात आला. नाणे मावळात काही घरांमध्ये ज्येष्ठा, कनिष्ठा अशा उभ्या गौरी प्रथेप्रमाणे बसवल्या गेल्या, तर काही घरांमध्ये दिंड्याच्या पानांपासून गौरीची फुले, दुर्वा,
पळसाची पाने, कुडाची पाने, शेंदुर्णीची पाने, तोंडली, कांतोली, शेडूळी, तेलपाट, गोमती. गोल्डास, तिरडा, हळदीची पाने आणि तिलाची. फुलांसारख्या सर्व प्रकारच्या नैसर्गिक वनस्पती गोळा करून त्यांची आत्म्याने पूजा केली जाते. यावेळी पारंपारिक पद्धतीने गौरींची पूजा करून नंतर उत्साहात आरती केली जाते.
मावळ तालुक्यातील शहरी व ग्रामीण भागात गौरी आगमनाच्या दिवशी गौरींना भाजी, भाकरी, खीर, पुरण पोळीचा नैवेद्य दाखविण्यात आला. सासरहून लेक माहेरी परतल्यावर कुटुंबयांना जो आनंदा होतो तसाच आनंदा घराघरात दिसत होता.





