बॉर्डर-2 मध्ये वरुण धवनची ‘एन्ट्री’

Entertainment । अभिनेता वरुण धवनने 1997 मध्ये आलेल्या ‘बॉर्डर’ या सुपरहिट चित्रपटाचा सिक्वेल असलेल्या ‘बॉर्डर 2’मध्ये एन्ट्रीची घोषणा केली आहे. आयुष्मान खुरानाने चित्रपटातून एक्झिट केल्यानंतर आता वरुण या मोठ्या चित्रपटाचा भाग बनला आहे.
खुद्द अभिनेत्याने इंस्टाग्रामवर या वृत्ताला दुजोरा दिला आहे. त्याने चित्रपटाचा टीझर शेअर केला आणि कॅप्शनमध्ये लिहिले, ‘मी चौथीत असताना बॉर्डर पाहिला. या चित्रपटाचा माझ्यावर खोलवर परिणाम झाला. आजही मला नाट्यगृहात आम्हा सर्वांना वाटलेली अभिमानाची भावना आठवते. त्या दिवसापासून मी आमच्या सैनिकांचा आदर करू लागलो आणि आमच्या सैन्याने आम्हाला नेहमीच वाचवले आहे. सीमा सुरक्षा असो किंवा कोणतीही नैसर्गिक आपत्ती असो, लष्कर आपल्यासाठी सदैव तत्पर असते.’
VARUN DHAWAN JOINS SUNNY DEOL IN ‘BORDER 2’… 23 JAN 2026 [*REPUBLIC DAY* WEEKEND] RELEASE… #VarunDhawan will enact a pivotal role in #India’s biggest war film #Border2… #SunnyDeol headlines the project, which is directed by #AnuragSingh.
Produced by Bhushan Kumar, Krishan… pic.twitter.com/1ElKn974Tf
— taran adarsh (@taran_adarsh) August 23, 2024
वरुणने पुढे लिहिले की, ‘जेपी दत्ता सरांचा बॉर्डर अजूनही माझ्या आवडत्या चित्रपटांपैकी एक आहे. जेपी सर आणि भूषण कुमार निर्मित बॉर्डर 2 चा भाग असणं हा माझ्या करिअरमधला एक खास क्षण आहे. सनी पाजीसोबत काम करणे माझ्यासाठी आणखी खास आहे. एका शूर सैनिकाची कथा मोठ्या पडद्यावर आणण्यासाठी मी तुमच्या आशीर्वादाची अपेक्षा करतो. हा भारतातील सर्वात मोठा युद्धपट असणार आहे. जय हिंद.’ असं म्हणत त्याने या चित्रपटात काम करणार असल्याची माहिती चाहत्यांसोबत शेअर केली आहे.
सनी देओलने यावर्षी जूनमध्ये ‘बॉर्डर 2′ ची घोषणा केली होती. ते म्हणाले होते, ’27 वर्षे जुने वचन पूर्ण करण्यासाठी पुन्हा एक सैनिक येत आहे. भारतातील सर्वात मोठा युद्ध चित्रपट, बॉर्डर 2.’
‘बॉर्डर २’ ची निर्मिती भूषण कुमार, कृष्ण कुमार, जेपी दत्ता आणि निधी दत्ता करत आहे. याचं दिग्दर्शन अनुराग सिंग करणार आहे, ज्यांनी यापूर्वी अक्षय कुमारचा ‘केसरी’ चित्रपट दिग्दर्शित केला होता.
===================





