Titeekshaa Tawde – सातव्या मुलीची सातवी मुलगी मालिका सध्या चांगली चर्चेत आहे. या मालिकेतील नेत्राचे पात्र साकारणारी अभिनेत्री तितीक्षा तावडे सध्या तिच्या सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत आली आहे. तिने पोस्ट शेअर करत चाहत्यांना ललवकरच लग्न करणार असल्याची माहीती दिली आहे.
काही दिवसांपूर्वी तितीक्षा तावडेने पोस्ट शेअर करत दृश्यम २ फेम अभिनेता सिद्धार्थ बोडकेसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याचे सांगितले होते. आता चाहत्यांना तितीक्षाने सिद्धार्थ बोडकेबरोबरचा केळवणाचा फोटो शेअर करत चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे. केळवणाचा फोटो शेअर करत लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याची माहिती तिच्या चाहत्यांना दिली आहे.
तितीक्षाने या फोटोमध्ये ऑफ व्हाइट रंगाची साडी, तर सिद्धार्थने पांढऱ्या रंगाचा सदरा परिधान केला आहे. या फोटोवर चाहत्यांसोबत अनेक सेलेब्सकडूनही लाईक्स आणि शुभेच्छांचा वर्षाव होत आहे, तिने या फोटोवर कॅप्शन दिले आहे कि,’त्याने मला डेटसाठी विचारलं आणि आमच्या या सुंदर डेटचं केळवणात रुपांतर झालं.’ असं कॅप्शन तितीक्षाने या फोटोला दिलं आहे.
दीपा चौधरी, गौरव मोरे, स्पृहा जोशी, ऋतुजा बागवे, गौतमी देशपांडे, अक्षया नाईक, सुरुची अडारकर, सुयश टिळक, भक्ती देसाई, ऐश्वर्या नारकर या कलाकारांनी कमेंट्स करत या दोघांना नव्या आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहे.
अभिनेता सिद्धार्थ बोडके – तितीक्षा तावडेने ‘तू अशी जवळी रहा’ या मालिकेत एकत्र काम केलं होतं. कन्यादान’, ‘तू अशी जवळी रहा’, ‘सरस्वती’ अशा अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये काम केलं आहे. सध्या ती ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ मालिकेद्वारे प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. याशिवाय सिद्धार्थ बोडके ‘दृश्यम २’ या बॉलीवूड चित्रपटात व नुकताच ‘श्रीदेवी प्रसन्न’मध्ये झळकला होता.