अमला पॉलच्या घरात चिमुकल्याचे ‘आगमन’

Entertainment News । साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील टॉप अभिनेत्रींपैकी एक अमला पॉलने गुड न्यूज दिली आहे. अमलाने एका मुलाला जन्म दिला असून आता ती आपल्या नवजात मुलाला घेऊन रुग्णालयातून घरी परतली आहे. अमला पॉलने चिमुकल्याच्या आगमनाचे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले आहे. ज्यामध्ये ती आपल्या मुलासोबत खेळतांना दिसत आहे. यासोबतच आपल्या मुलासाठी वडिलांचे घर कसे सजवले होते हे देखील या व्हिडिओमध्ये दाखवण्यात आले आहे.
अमलाने नोव्हेंबर २०२३ मध्ये जगत देसाईसोबत लग्न केले. लग्नानंतर सुमारे 2 महिन्यांनी तिने प्रेग्नेंसीची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली होती. यानंतर अमलाने सतत तिच्या बेबी बंपची झलक सोशल मीडियावर शेअर केली आहे. अलीकडेच तिने बेबी बंपमध्ये डान्स करतानाचा एक व्हिडिओही शेअर केला होता.
अशात या जोडप्याने सोशल मीडियावर चुकल्याची झलक दाखविणारा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये त्यांनी आपल्या मुलाचे नाव काय ठेवले आहे हे देखील सांगितले आहे. दरम्यान, आई-वडील झाल्याबद्दल चित्रपटसृष्टीतील अनेक लोक आणि सामान्य चाहतेही त्यांचे अभिनंदन करत आहेत.
दरम्यान वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर अमलाने ‘नीलथमारा’ या मल्याळम चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. ‘देवा थिरुमगल’, ‘मुप्पोझुधुम उन कर्पनैगल’, ‘नायक’, ‘रन बेबी रन’, ‘इद्दारमामयिलाथो’, ‘व्हीआयपी’ यांसारख्या अनेक उत्तमोत्तम चित्रपटांमध्ये तिने काम केले. तिने अजय देवगणच्या ॲक्शन-थ्रिलर ‘भोला’मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे.





