रॉकस्टार चित्रपटाच्या सिक्वेल येणार ? दिग्दर्शक इम्तियाज अलीने दिली माहिती

Entertainment । हिंदी चित्रपटसृष्टीतील सिक्वेलचा सध्या ट्रेंड सुरु आहे. अनेक चित्रपटांचे सिक्वेल बघायला मिळत आहे. अशात 2011 मध्ये रिलीज झालेल्या रॉकस्टार चित्रपटात अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री नर्गिस फाखरी मुख्य भूमिकेत होते. या चित्रपटाचा सिक्वेल येणार असल्याची चर्चांही अनेकदा सोशल मीडियावर रंगतांना दिसते. अशात रॉकस्टार चित्रपटाचे दिग्दर्शक इम्तियाज अलीने या चित्रपटाच्या सिक्वेल बाबत खुलासा केला आहे.
इम्तियाजने चित्रपटाच्या सिक्वेल करण्याचे संकेत दिले आहे. अलीकडेच संगीतकार ए आर रहमान, गीतकार इर्शाद कामिल आणि गायक मोहित चौहान यांच्या इम्तियाजसोबतच्या संभाषणाचा व्हिडिओ नेटफ्लिक्स या डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे जारी करण्यात आला आहे. यामध्ये चौघांनीही एकत्र केलेल्या त्यांच्या चित्रपट आणि गाण्यांबाबत चर्चा झाली.
यावेळी एआर रहमान इम्तियाजला विचारतो की,’आपण रॉकस्टार 2 बनवत आहोत का? यावर इम्तियाज म्हणतो, ‘याबद्दल सांगण्यासाठी आपल्याकडे संगीतदृष्ट्या काहीतरी असलं पाहिजे.’ दरम्यान, एआर रहमान इम्तियाजला कथा क्राउडसोर्स करण्यास सुचवतो. तो म्हणतो की आपण ते जनतेवर सोडले पाहिजे. हा (चित्रपट) आपण त्यांना दिला पाहिजे. यानंतर इम्तियाज रॉकस्टार 2 वर आशा व्यक्त करतो आणि आशा करतो की लवकरच काहीतरी भन्नाट प्रेक्षकांच्या भेटीला येईल.





