अजय देवगण-जॅकी श्रॉफचे काश्मीरमधील ॲक्शन सीन लीक

Entertainment । ‘सिंघम अगेन’चे शूटिंग वेगाने सुरू असून प्रेक्षक या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहे. आता या चित्रपटाच्या शूटिंगबाबत नवी माहिती समोर आली आहे, त्यामुळे प्रेक्षकांचा उत्साह वाढला आहे. चित्रपट निर्माता रोहित शेट्टीने जम्मू-काश्मीरमध्ये त्याच्या आगामी ‘सिंघम अगेन’ या ॲक्शन चित्रपटाचे शूटिंग सुरू केले आहे. ते श्रीनगरच्या अंतर्गत भागात शूटिंग करत आहेत.
अजय देवगणच्या शूटिंगचे काही व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. रोहित शेट्टी आणि त्याची टीम नुकतीच चित्रपटाच्या शूटिंगसाठी घाटीत पोहोचल्याची माहिती समोर येत आहे. या चित्रपटाच्या अंतिम टप्प्याचे शूटिंग सुरू आहे. अधिका-यांनी सांगितले की,’चित्रपटाचे शूटिंग शहराच्या काही भागात किंवा कडेकोट बंदोबस्तात करण्यात आले आहे. यावेळी अजय देवगण आणि अभिनेता जॅकी श्रॉफ यांनी फोटोशूट केले.
Singham Again fight sence 💥
AjayDevgn Jacky Shroff #AjayDevgn #Srinagar #Movie #Shooting #SinghamAgain @ajaydevgn #Kashmir #Bollywood pic.twitter.com/mbrJNzShl2— Aniket Shrivastwa (@IamAks_) May 18, 2024
अजय देवगण शहरात त्याचा को-स्टार जॅकी श्रॉफसोबत फाईट सीक्वेन्स शूट करताना दिसला. सेटवरील अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये अजय देवगण पोलिसांचा गणवेश परिधान केलेला दिसत होता. या चित्रपटाच्या टीमने खोऱ्यातील विविध ठिकाणांची फेरफटका मारली आहे. रोहित शेट्टी यांनी शुक्रवारी राजभवनात जम्मू-काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांची भेट घेतली.
This Pic Is From Singham 3 Shooting In J&K In black That Are Real SOG Personnel’s. pic.twitter.com/GUDF9WByKC
— SQUAD SCORPION 7 🇮🇳 (@Silent_Forces0) May 18, 2024
‘सिंघम अगेन’ हा रोहित शेट्टीच्या कॉप युनिव्हर्सचा पाचवा भाग आहे, ज्यामध्ये रणवीर सिंगचा 2018 चा ‘सिम्बा’ आणि अक्षय कुमार अभिनीत 2021 चा ‘सूर्यवंशी’ देखील आहे.
Capturing the action: Singham 3 brings the thrill to Zainakadal, Srinagar#singham3 #kashmir #srinagar pic.twitter.com/kvhrHPZ9Ji
— Faisal Manzoor (@_Faisal_Manzoor) May 18, 2024
‘सिंघम अगेन’ हा अजय देवगनची मुख्य भूमिका असलेला ‘सिंघम’ मालिकेतील तिसरा चित्रपट आहे, ज्याची सुरुवात 2011 च्या ‘सिंघम’पासून झाली होती. त्यानंतर 2014 मध्ये अजय देवगण ‘सिंघम रिटर्न्स’मधून परतला. त्याचवेळी तो आता ‘सिंघम अगेन’मधून प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे.
हे वाचले का ? ‘जॉली एलएलबी 3’ च्या राजस्थान शेड्यूलचे शूटिंग पूर्ण





