Oscars 2025 : घरबसल्या घ्या अमेरिकेतला अॅास्कर सोहळा पाहण्याचा आनंद; ‘या’ दिवशी येथे पाहू शकता, जाणून घ्या..

अकादमी अॅाफ मोशन पिक्चर अर्थात जगातील सर्वात मानाचा आणि प्रतिष्ठेचा मानला जाणारा आंतराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार अर्थात अॅास्कर २०२५ पुरस्काराची घोषणा २३ जानेवारीला झाली होती. त्यानंतर हा पुरस्कार सोहळा कधी होणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. अखेर ९७ वा अकादमी पुरस्कार कॅलिफोर्नियातील डॅाल्बी थिएटरमध्ये होणार असून, याचे लाईव्ह स्ट्रमिंग करण्यात येणार आहे. भारतातील नागरिकांना हा पुरस्कार सोहळा कसा लाइव्ह पाहायला मिळणार याविषयी जाणून घेऊयात…
The 97th Academy Awards streaming LIVE, March 3, 5:30 AM onwards, only on #JioHotstar! #OscarsOnJioHotstar https://t.co/V1TapnaHkc
— JioHotstar (@JioHotstar) February 27, 2025
3 मार्च रोजी हा पुरस्कार सोहळा पार पडणार आहे. या बहुप्रतिक्षित पुरस्कार सोहळ्याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. या दिवशी सकाळी साडेपाच वाजता स्टार मूव्हीज, स्टार मूव्हीज सिलेक्ट आणि जिओ हॅाटस्टारवर अॅास्कर सोहळ्याचा घरी बसून लाईव्ह आनंद घेता येणार आहे. तसेच याच दिवशी संध्याकाळी ७ वाजता हा कार्यक्रम ABC-TV आणि ४ वाजता PT वर थेट प्रसारित केला जाईल. तसेच Hulu नावाच्या ऑनलाइन प्लॅटफॅार्मवरही हा सोहळा स्ट्रीम केला जाईल.
हे आहेत अॅास्कर स्पर्धेतील चित्रपटांची नावे
- Anora
- The Brutalist
- A Complete Unknown
- Conclave
- Dune: Part Two
- Emilia Pérez
- I’m Still Here
- Nickel Boys
- The Substance
- Wicked



