सोशल मीडियामुळे इंग्रजी व्याकरणाला घरघर

लंडन – इंग्रजी ही जगात सर्व जास्त प्रमाणात बोलली जाणारी भाषा मानली जाते त्यामुळे बोलीभाषेमध्ये इंग्रजी अद्याप टिकून असली तरी सोशल मीडियावर वापरण्यात येणाऱ्या लिखित भाषेमध्ये मात्र इंग्रजी व्याकरणाला घरघर लागली आहे. सोशल मीडियावर विविध प्लॅटफॉर्मवर संदेश देवाणघेवाणीची काम करणारी तरुण पिढी व्याकरणाच्या आणि इंग्रजी भाषेच्या नियमाकडेही दुर्लक्ष करत आहे.
ब्रिटनमध्ये लॅंकेस्टर विद्यापीठात याबाबतचे संशोधन प्रसिद्ध केले असून गेल्या तीस वर्षांच्या कालावधीमध्ये सोशल माध्यमे सक्रिय झाल्यानंतर इंग्रजी भाषेच्या व्याकरणाला मोठ्या प्रमाणावर घरघर लागल्याचे या संशोधनात म्हटले आहे.
सोशल मीडियावरील ट्विटर किंवा इतर प्लॅटफॉर्मवर शब्द संख्येची मर्यादा असल्याने आपला संदेश पोहोचवण्याच्या नादात व्याकरणाचे मूलभूत नियमही धाब्यावर बसवले जातात या संशोधनात एक उदाहरण देण्यात आले आहे.
एखाद्या व्यक्तीच्या मालकीची माहिती द्यायची असेल तर त्या शब्दाला इंग्रजी भाषेत ओपोस्ट्रोपी एस लावला जातो पण नवीन पिढीला ओपोस्ट्रोपी एसचा वापरच मान्य नाही आणि इंग्रजी भाषेमध्ये एखाद्या वस्तूच्या स्पेलिंगला एस लावला तर त्या वस्तूचा अनेकवचनी अर्थ होतो पण नव्या पिढीला या फरकाची दखल घ्यावी वाटत नाही.
ओपोस्ट्रोपी एसचा वापर सोशल मीडिया वरून संपूर्णपणे लुप्त झाला आहे या संशोधनाचे नेतृत्व करणारे डॉक्टर वेल्कॅम ब्रिटानिया यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे गेल्या तीस वर्षांच्या कालावधीमध्ये इंग्रजी भाषेच्या व्याकरणआकडे मोठ्या प्रमाणावर दुर्लक्ष केले जात आहे संवाद साधण्यासाठी नवनवीन प्रयोग केले जात आहेत बोलीभाषा पेक्षा लिखित भाषेमध्ये असे प्रयोग केले जात असल्यामुळे व्याकरणाच्या मूलभूत नियमांकडे दुर्लक्ष होत आहे.
मूलभूत नियमांचा वापर करून शब्दरचना करण्याऐवजी नवी पिढी वेगळे तंत्र वापरत असल्याने त्याला भाषा तज्ञांनी मोठ्या प्रमाणावर विरोध केला आहे अशा प्रकारच्या भाषा रचनेतून जरी संदेशवहनाचे काम होत असले तरी भाषेसाठी ते धोकादायक आहे असे या तज्ञांचे म्हणणे आहे. ओपोस्ट्रोपी एसचा वापर मोठ्या प्रमाणावर कमी झाला आहे. या व्यतिरिक्त मिस्टर अँड मिसेस या शब्दांचा वापरही कमी झाला आहे. आता तरुण पिढी फर्स्ट नेमचाच करत आहे. या व्यतिरिक्त सोशल मीडियावर अमेझिंग या शब्दाचा वापर गेल्या तीस वर्षांमध्ये सहाशे टक्क्यांनी वाढला आहे.





