IPL 2023 – इंग्लंड संघाने नुकत्याच जिंकलेल्या टी-२० विश्वचषक (T20 WorldCup 2022) च्या विजेतेपदाचे परिणाम आता समोर येत आहेत. विश्वचषकातील या विजयामुळे इंग्लंडने संपूर्ण जगभरातील क्रिकेटला वेगळेच वळण दिल्याचे दिसत आहे. कारण इंग्लंडचा यष्टीरक्षक फलंदाज सॅम बिलिंग्जने पुढील वर्षी होणाऱ्या इंडियन प्रीमियर लीग म्हणजे आयपीएल ( IPL 2023 ) मधून माघार घेतली आहे. आयपीएल २०२२ मध्ये बिलिंग्सने कोलकाता नाईट रायडर्ससाठी आठ सामने खेळले असून त्याने १६९ धावा केल्या होत्या. बिलिंग्सने २०१६ साली आयपीएलमध्ये पदार्पण केले होते.
मोठी बातमी! टेबल टेनिसपटू अचंता शरथला 2022चा खेलरत्न पुरस्कार
बिलिंग्सने ट्विट केले की, “मी माझ्या कारकिर्दीतील एक कठोर निर्णय घेतला आहे. मी पुढील वर्षीच्या आयपीएलमध्ये ( IPL 2023 ) खेळणार नाही. मला इंग्लंडमध्ये उन्हाळी हंगामात केंटसाठी कसोटी फॉरमॅट क्रिकेट खेळण्यावर लक्ष केंद्रित करायचे आहे. मला संधी दिल्याबद्दल कोलकाता नाईट रायडर्सचे मनापासून आभार. केकेआरसोबत घालवलेला प्रत्येक क्षण मी एन्जॉय केला आहे. आशा आहे की मी भविष्यात पुन्हा तुमच्यासाठी खेळेन.”
आयपीएलमध्ये ( IPL 2023 ) आपल्या संघातील खेळाडूंना कायम ठेवण्याच्या अंतिम मुदतीच्या एक दिवस आधी बिलिंग्सने आयपीएलमधून माघार घेण्याची घोषणा केली. बिलिंग्जच्या या निर्णयावरून खेळाडूंनी आता आपली प्रथम पसंती स्पष्ट केली आहे. विशेषत: इंग्लंडचे क्रिकेटपटू देशातील क्रिकेटसाठी आयपीएलच्या महागड्या करारांकडेही दुर्लक्ष करत आहेत. त्याचबरोबर इतर देशाचेही काही खेळाडू आयपीएलसारख्या व्यावसायिक क्रिकेटऐवजी देशातील क्रिकेटला जास्त प्राधान्य देत आहेत.
Sam Billings will be a part of the beginning of our @CountyChamp season after confirming that he will not be taking part in the IPL this Spring 🏏
— Kent Cricket (@KentCricket) November 14, 2022