“भारतात परत येणे ही माझी सर्वात मोठी चूक…” ; अमेरिकेतील ८ पट जास्त पगाराची नोकरी सोडून आलेल्या इंजिनिअरची पोस्ट व्हायरल

Engineer’s post goes viral। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प निवडून आल्यापासून अनेक निर्णय घेत आहेत. त्यात काहींना याचा फक्त तर काहींना तोटा सहन करावा लागत आहे. त्यामुळे तिथे स्थायिक झालेले नागरिक त्यांच्या मायदेशी परत जात आहेत. मात्र परतलेल्या लोकांना याचा मोठा पश्चाताप होत असल्याचे आता समोर येत आहे. याचे एक उदाहरण नुकतेच भारतातून समोर आले आहे. भारतात परतण्याचा निर्णय चुकल्याबाबतची एका व्यक्तीची रेडिट पोस्ट सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये त्याने भारतात परतल्यानंतर आणि भारतात परतण्यापूर्वी त्याचे आयुष्य कसे होते,याविषयीची माहिती दिली आहे.
रेडिट पोस्टमध्ये या व्यक्तीने अमेरिकेतून मास्टर्स केले असून, नंतर H1B व्हिसाची वैधता संपेपर्यंत ४ वर्षे अमेरिकेत काम केले. २०२२ मध्ये त्याच्या अमेरिकन कंपनीतून राजीनामा देऊन हा व्यक्ती अखेर भारतात परतला. पण, भारतात परतून साडेतीन वर्ष झाल्यानंतरही, या व्यक्तीला अजूनही त्याच्या भारतात परतण्याबद्दलच्या निर्णयाचा पश्चात्ताप होत असल्याचे म्हटले आहे.
आठ पट जास्त पगार Engineer’s post goes viral।
पोस्टनुसार, हा व्यक्ती अमेरिकेत ज्या पदावर होता त्याच पदावर तो भारतात मिळणाऱ्या पगारापेक्षा ‘आठ पट जास्त’ पगार मिळवत होता. त्याचा भारतातील पगार तुलनेने खूपच कमी आहे. यामुळे त्याच्या बचतीवरही परिणाम झाला आहे. या पोस्टमध्ये या व्यक्तीने अमेरिकेतील उत्तम वर्क-लाईफ बॅलन्स, स्वच्छ हवा आणि पायाभूत सुविधा यासारख्या घटकांवरही भाष्य केले आहे.
पोस्टच्या सुरुवातीला या इंजिनीयरने, “मी अमेरिकेतून माझे मास्टर्स केले आणि तिथेच ४ वर्षे नोकरी केली. तोपर्यंत माझा H1B व्हिसा संपला आणि मला राजीनामा द्यावा लागला. तसेच यामुळे मला २०२२ मध्ये परत भारतात यावे लागले. तिथून खूप वाईट परिस्थिती आली आहे. मी सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून काम करतो आणि मी अमेरिकेत इथल्यापेक्षा ८ पट जास्त कमाई करत होतो. तिथली माझी मासिक बचत इथल्या माझ्या वार्षिक बचतीपेक्षा जास्त होती.” असे सांगत त्यांनी त्याने त्याची व्यथा मांडली.
यातून कसे बाहेर पडायचे Engineer’s post goes viral।
पुढे आपल्या पोस्टमध्ये त्याने, “इथल्या तुलनेत तिथे वर्क-लाईफ बॅलन्स उत्तम होता, स्वच्छ हवा आणि चांगल्या पायाभूत सुविधा यासारख्या इतर घटकांकडेही दुर्लक्ष करता येत नाही. मी याठिकाणी पैसे मिळवण्यासाठी खूप झटत आहे. माझी मास्टर्स डिग्री आणि अमेरिकेतील नोकरीच्या जोरावरही मला चांगले पॅकेज मिळवण्यास मदत होत नाही. कारण याठिकाणी कंपन्यांना त्याची अजिबात पर्वा नाही. आता यातून कसे बाहेर पडायचे हे मला माहित नाही”, असे म्हणत त्याने आपली पोस्ट संपवली आहे.





