पत्नीच्या जाचाला कंटाळून इंजिनिअर पतीची आत्महत्या, आत्महत्येपूर्वी बनवलेल्या व्हिडीओत सांगितली वेदनादायक कहाणी

Atul Subhas Suicide: पत्नीच्या जाचाला कंटाळून एका इंजिनिअरने आत्महत्या केल्याची बातमी कर्नाटकची राजधानी बेंगळुरूमध्ये समोर आली आहे. सुसाईट नोटमध्ये पतीने पत्नीवर अनेक आरोप केले आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अतुल सुभाष ( वय 34) बेंगळुरूच्या मराठाहल्ली येथे राहत होते. त्याने पत्नी आणि तिच्या नातेवाईकांवर छळ केल्याचा आरोप केला आहे. आपल्यावर अनेक खटले दाखल केले, 3 कोटींची मागणी करत आहेत, असे आरोप त्याने आपल्या पत्नीवर आणि पत्नीच्या नातेवाईकांवर केले आहे.
अतुल सुभाष हे बेंगळुरू शहरातील महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीत आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) मध्ये काम करत होते. आत्महत्येदरम्यान त्यांने घातलेल्या टी-शर्टवर एक पान अडकले होते. ज्यावर लिहिले होते- जस्टिस इज ड्यू.
अतुल सुभाषने पंख्याला गळफास लावून घेतला –
मीडिया रिपोर्ट्सनुसार, 9 डिसेंबरला सकाळी 6 वाजता पोलिसांना फोन आला. आत्महत्येची माहिती देण्यात आली होती. पोलीस घटनास्थळी पोहोचले असता त्यांना घर आतून बंद असल्याचे दिसले. स्थानिक लोकांच्या मदतीने दरवाजा तोडण्यात आला. यानंतर अतुल सुभाष याने बेडरूममधील पंख्याला नायलॉनच्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघड झाले. रिपोर्टनुसार, पोलिसांनी दावा केला आहे की अतुल कथितपणे नैराश्याने ग्रस्त होता. आत्महत्या करण्यापूर्वी सुभाषने महिलांवरील कौटुंबिक हिंसाचाराच्या प्रकरणांवर काम करणाऱ्या एनजीओला व्हॉट्सॲप मेसेजही पाठवला होता. तो आत्महत्या करणार असल्याची माहितीही तरुणाने एनजीओला दिली होती.
पत्नीने गुन्हा दाखल केला –
बेंगळुरूच्या अतुल सुभाषचे लग्न उत्तर प्रदेशातील जौनपूर येथील निकिता सिंघानियासोबत झाले होते. लग्नानंतर काही दिवस सर्व काही ठीक चालले होते, त्यानंतर निकिता अचानक बंगळुरूहून जौनपूरला परतली. तिने पती अतुल आणि सासरच्यांविरुद्ध हुंडाबळीसाठी छळ आणि घरगुती हिंसाचाराचा गुन्हा दाखल केला.
अतुलने सासरच्या मंडळींवर आरोप केले –
आत्महत्येपूर्वी बनवलेल्या व्हिडिओमध्ये अतुल सुभाषने सांगितले की, त्यांच्या मृत्यूला त्यांची पत्नी निकिता सिंघानिया, सासू निशा सिंघानिया, मेहुणा अनुराग सिंघानिया उर्फ पियुष सिंघानिया, चुलत सासरा सुशील सिंघानिया जबाबदार आहेत. अतुलने सांगितले की, त्याची पत्नी आणि सासरच्यांनी पैसे उकळण्याचा मोठा कट रचला. त्यांच्या कुटुंबीयांना खोट्या प्रकरणात गोवण्यात आले.
अतुल सुभाषला त्रास होत होता-
आपल्या व्हिडिओमध्ये अतुल पुढे म्हणाले की, कोर्टात आतापर्यंत 120 तारखा लागल्या आहेत. अतुल स्वतः बेंगळुरूहून जौनपूरला 40 वेळा गेला होता. याशिवाय त्याचे आई-वडील आणि भावालाही कोर्टाच्या फेऱ्या माराव्या लागतात. बहुतेक तारखांना न्यायालयात काहीही घडत नव्हते. सुनावणीदरम्यान वकील पुढील तारखेची मागणी करत होते. अतुलला वर्षभरात फक्त 23 सुट्ट्या मिळायच्या आणि तो या व्यवस्थेला कंटाळला होता. त्यामुळे हे पाउल उचलल्याचे अतुल यांनी व्हिडीओमध्ये सांगितले.





