ENG vs PAK 2nd Test Day 1 : पदार्पणाच्या कसोटीत गुलामचे शतक; दिवसअखेर पाकच्या 5 बाद 259 धावा…

ENG vs PAK 2nd Test Day 1 (Kamran Ghulam) : पाकिस्तानचा स्टार फलंदाज बाबर आझमच्या जागी इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीसाठी पाकिस्तान संघात समाविष्ट करण्यात आलेल्या कामरान गुलामने आपली प्रतिभा दाखवत शतक झळकावले. पदार्पण करणाऱ्या कामरान गुलामच्या याच दमदार शतकी खेळीच्या जोरावर पाकिस्तान संघाने इंग्लंड विरुद्ध दुसऱ्या कसोटी पहिल्या दिवशी 5 बाद 259 धावांपर्यंत मजल मारली आहे.
Kamran Ghulam’s debut ton headlines day one of the second Test 💫
Pakistan are 259-5 with Rizwan and Salman at the crease 🏏
Scorecard: https://t.co/sDVJBTiJUN#PAKvENG | #TestAtHome pic.twitter.com/QswdlovcEm
— Pakistan Cricket (@TheRealPCB) October 15, 2024
पहिल्या दिवशी नाणेफेक जिंकून पाकिस्तान संघाने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. अब्दुल्लाह शफिक व सैम अयुब यांनी केवळ 7 धावांची सलामी दिली. जॅक लीचने प्रथम अब्दुल्लाह शफिक (7) तर नंतर कर्णधार शान मसूदला (3) झटपट बाद करताना पाकिस्तानची अवस्था 2 बाद 19 अशी केली.
यानंतर सैम अयुब व पदार्पण करणारा कामरान गुलाम यांनी 149 धावांची भागीदारी केली. दरम्यान सैम अयुब व कामरान गुलाम यांनी आपली अर्धशतके पूर्ण केली. 77 धावांवर असताना सैम अयुबचा अडसर मॅथ्यू पॉट्सने दूर केला. त्यानंतर आलेल्या सौद शकीलला (4) कार्सने झटपट बाद केले. त्यानंतर कामरान गुलाम व मोहम्मद रिझवान यांनी 65 धावांची भागीदारी केली.
यात कामरान गुलामने 192 चेंडूत 9 चौकार व 1 षटकार लागावताना पहिले शतक झळकावले. इंग्लंडच्या शोएब बशीरने कामरान गुलामची खेळी 118 धावांवर संपुष्टात आणली. यासह पदार्पणात शतक झळकावणारा गुलाम हा पाकिस्तानचा 13वा फलंदाज आणि इंग्लंडविरुद्ध हा पराक्रम करणारा पाकिस्तानचा पहिला फलंदाज ठरला आहे. यानंतर मोहम्मद रिझवान (37) व सलमान आघा यांनी अजून पडझड होवू दिली नाही. इंग्लंडकडून जॅक लीचने 2 तर शोएब बशीर, मॅथ्यू पॉट्स व ब्रायडॉन कार्स यांनी प्रत्येकी 1 बळी टिपला.





