चंदा कोचर यांच्या मालमत्तांवर टाच
Updated On:

नवी दिल्ली : आयसीआयसीआय बॅंकेच्या अध्यक्षा चंदा कोचर आणि अन्य काही जणांची 78 कोटी रूपयांच्या मालमत्तेवर अंमलबजावणी संचनालयाने टाच आणली. यापुर्वी चंदा कोचर यांचे दीर राजीव कोचर यांची इडीकडून चौकशी र्कन्यात आली होती
राजीव कोचर हे सिंगापूर येथील अविस्ता ऍडव्हायझरी कंपनीचे संस्थापक आहेत. कर्ज फेररचनेत या कंपनीच्या भूमिकेबाबत सीबीआयने चौकशी केली होती.
आयसीआयसीआय बॅंकेकडून व्हिडिओकॉनला दिलेया कर्जात त्यांची भूमिका काय होती याबाबत सीबीआयने चौकशी केली. कोचर दाम्पत्याची इडीच्या विभागीय कार्यालयात चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर त्यांचे निवासस्थान आणि व्हिडिओकॉनच्या मुंबई आणि औरंगाबाद येथील कार्यालयांवर छापे घालण्यात आले.
या समुहाला आयसीआयसीआय कंपनीने नियमबाह्य पध्दतीने दिलेल्या एक हजार 875 कोटी रूपयांच्या कर्जाबद्दल गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
टॅग्स:





