इमरान हाश्मीच्या ‘ग्राउंड झिरो’ चित्रपटाने चार दिवसातच तोडला दम; किती रुपयांची केली कमाई?

Ground Zero Box Office Collection | बॉलिवूड अभिनेता इमरान हाश्मीचा ‘ग्राउंड झिरो’ चित्रपट 25 एप्रिलला रिलीज झाला. या चित्रपटाने पहिल्या दिवसापासून संथपणे कमाई करण्यास सुरुवात केली आहे. या चित्रपटाला रिलीज होऊन आता चार दिवस पूर्ण झाले आहेत. मात्र हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करण्यास अपयशी ठरला आहे.
‘ग्राउंड झिरो’ चित्रपटाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन पहिल्या दिवशी 1.15 कोटी, दुसऱ्या दिवशी 1.90 कोटी, तिसऱ्या दिवशी 2.15 कोटी आणि चौथ्या दिवशी सर्वात कमी 70 लाख होते. या चित्रपटाने चार दिवसांत 5.90 कोटी रुपयाची कमाई केली आहे. ‘ग्राउंड झिरो’ चित्रपट भविष्यात किती कमाई करतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, ‘ग्राउंड झिरो’ चित्रपटाचे ओटीटी राइट्स प्राइम व्हिडीओने खरेदी केले आहेत. चित्रपटाच्या रिलीजनंतर दोन ते तीन महिन्यांमध्ये ‘ग्राउंड झिरो’ चित्रपट ओटीटीवर पाहता येणार आहे. मात्र अद्याप ‘ग्राउंड झिरो’ ओटीटी रिलीजची अधिकृत तारीख समोर आलेली नाही. Ground Zero Box Office Collection |
‘ग्राउंड झिरो’मध्ये इमरान हाश्मीसोबत मराठमोळी अभिनेत्री सई ताम्हणकर देखील झळकली आहे. इमरान हाश्मीचा ‘ग्राउंड झिरो’ हा चित्रपट बीएसएफ अधिकारी नरेंद्र नाथ दुबे यांच्यावर आधारित आहे. ‘ग्राउंड झिरो’ चित्रपटात इमरान हाश्मी, सई ताम्हणकरसोबत ललित प्रभाकर, मुकेश तिवारी, दीपक परमेश, रॉकी रैना, झोया हुसैन हे कलाकार देखील झळकले. Ground Zero Box Office Collection |
हेही वाचा:
“दहशतवादाला पोसणार हा दुष्ट देश…” ; संयुक्त राष्ट्रात पुन्हा भारताने पाकला दाखवला आरसा





