‘गुडचारी 2’च्या शूटिंगदरम्यान इमरान हाश्मी झाला,’जखमी’

अभिनेता इम्रान हाश्मी ‘गुडचारी 2’च्या शूटिंगदरम्यान जखमी झाला आहे. तो हैदराबादमध्ये ‘गुडचारी 2’ चित्रपटातील ॲक्शन सीनचे शूट करत असतांना त्याच्या मानेला दुखापत झाली. जंप सीक्वेन्स दरम्यान तो जखमी झाला, ज्यामुळे त्याच्या मानेवर खोल कट बसला. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका फोटोत अभिनेत्याच्या दुखापतीसोबत रक्त दिसत आहे. हा फोटो बघू त्याच्या चाहत्यांनी चिंता व्यक्त केली आहे.
या घटनेबाबत प्रॉडक्शनकडून कोणतीही माहिती समोर आलेली नाही. वृत्तानुसार, इमरान हाश्मीला एक कठीण स्टंट शूट करताना ही दुखापत झाली. प्रॉडक्शन सेटवरील एका सूत्राने सांगितले की, ‘इमरान एक ॲक्शन सीन शूट करत असताना त्याच्या मानेला दुखापत झाली. उडी मारण्याच्या दृश्यादरम्यान ही दुखापत झाली. मात्र, त्याच्यावर तात्काळ प्राथमिक उपचार करण्यात आले असून तो लवकरच शूटिंगला पुन्हा सुरुवात करेल अशी अपेक्षा आहे.
इमरान हाश्मीचे चित्रपट
ऑगस्टमध्ये अभिनेता आदिवी शेषने इमरान हाश्मीच्या ‘गुडचारी 2’ मध्ये तिचा सहभाग जाहीर केला होता. त्यामुळे त्यांचे चाहते प्रचंड उत्साहित झाले. हा एक तेलुगु चित्रपट आहे, ज्यामध्ये दोन्ही कलाकार वेगवेगळ्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत. याशिवाय 2025 मध्ये प्रदर्शित होणाऱ्या पवन कल्याणच्या सिनेमातही हा अभिनेता दिसणार आहे.
==========





