इमरान हाश्मीला मागायची ऐश्वर्या रायची माफी; ‘त्या’ विधानाबाबत व्यक्त केला खेद

Emraan Hashmi And Aishwarya Rai| बॉलीवूड अभिनेता इमरान हाश्मी सध्या त्याच्या ‘शो टाइम’ या वेबसिरिजमुळे चर्चेत आहे. अनेकदा इमरान वादांपासून दुर राहताना दिसतो. मात्र नुकतेच एका मुलाखतीदरम्यान त्याने ऐश्वर्या राय-बच्चनबाबत केलेल्या एका वक्तव्याप्रकरणी पश्चाताप होत असल्याचे सांगितले. तसेच तिला भेटून तिची माफी मागायची असल्याचे सांगितले.
करण जोहरच्या चॅट शो ‘कॉफी वथ करण’च्या चौथ्या सीझनमध्ये इमरान हाश्मीने ऐश्वर्या रायवर कमेंट केली होती, जेव्हा तो शोमध्ये पाहुणा म्हणून आला होता. तेव्हा एक खेळ खेळताना इमरानने ऐश्वर्या राय-बच्चनला ‘प्लास्टिक’ म्हटलं होतं. त्यानंतर त्याला सोशल मीडियावर खूप ट्रोल करण्यात आले होते. यानंतर आता काही वर्षानंतर इमरान हाश्मीने या विषयावर बोलत खेद व्यक्त केला.
मुलाखतीदरम्यान इमरान म्हणाला की, “मला या गोष्टीचा पश्चाताप होत आहे. गिफ्ट हँपर जिंकण्यासाठी मी तसं उत्तर दिलं होतं. मी तिचा खूप सन्मान करतो. आता लोक खूप जास्त संवेदनशील झाले आहेत. सोशल मीडियावर प्रत्येक गोष्टीवर नाराजी व्यक्त केली जातं आहे. जर ऐश्वर्या राय-बच्चनला वाईट वाटलं असेल तर मला तिची माफी मागायची आहे.” Emraan Hashmi And Aishwarya Rai|
पुढे इमरान म्हणाला, “मी स्वतः ऐश्वर्याचा खूप मोठा चाहता आहे. ‘हम दिल दे चुके सनम’ चित्रपटाच्या वेळी ऐश्वर्या राय-बच्चनला पाहण्यासाठी मी तिच्या व्हॅनिटी व्हॅनच्या बाहेर ३ तास उभा होतो. त्यावेळेस मी ‘कसूर’ चित्रपटाचं चित्रीकरण करत होतो आणि ऐश्वर्या ‘हम दिल दे चुके सनम’ चित्रपटाचं चित्रीकरण करत होती. मी अजूनपर्यंत तिला प्रत्यक्षात भेटलो नाही, पण जेव्हा भेटेन तेव्हा तिची माफी मागेन.”
दरम्यान, इमरान हाश्मीची ‘शोटाईम’ ही वेबसीरिज हॉटस्टारवर प्रदर्शित झाली आहे. यात मौनी रॉय, श्रिया सरन, महिमा मकवाना, नसीरुद्दीन शाह, राजीव खंडेलवाल हे कलाकार मंडळी देखील आहेत. Emraan Hashmi And Aishwarya Rai|
हेही वाचा:





