Emraan Hashmi : इमरान हाश्मीचा ‘रुह’मधील खतरनाक लुक समोर
Emraan Hashmi: ‘रूह’ चित्रपटाचा पहिला टीझर रिलीज झाला असून यामध्ये इमरान हाश्मी मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

Emraan Hashmi : अभिनेता इमरान हाश्मी (Emraan Hashmi ) एका हॉरर चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. एकीकडे इमरान त्याच्या ‘आवारापन-२’ या चित्रपटामुळे चर्चेत असताना त्याच्या ‘रुह’ या आगामी चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे.
‘रुह’ या म्युझिकल हॉरर चित्रपटातून इमरान हाश्मी जवळपास ५ वर्षानंतर हॉरर चित्रपटांच्या दुनियेत एन्ट्री घेत आहे. यामध्ये इमरान हाश्मी मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
‘रूह’ चित्रपटाचा पहिला टीझर रिलीज झाला असून, त्याची सुरुवात एका अतिशय दमदार ओळीने होते. त्यात लिहिले आहे, “जेव्हा एखादा जुना खेळाडू पुन्हा एकदा अंधारात पाऊल ठेवतो, तेव्हा एका भयंकर स्वप्नाचा जन्म होतो”. (Emraan Hashmi)
View this post on Instagram
टीझरमध्ये सुरुवातीला जळणाऱ्या जंगलाची भयावह दृश्ये दिसतात. यात हवेत तरंगणारे प्रेत पाहायला मिळते. पुढच्याच क्षणाला कोणीतरी काचेवर साचलेला बर्फ हाताने साफ करतो, ज्याच्या मागे इमरान हाश्मीचे अत्यंत गंभीर आणि भयावह डोळे दिसून येतात. जे पाहताच अंगावर काटा येतो.
या चित्रपटाबाबत चाहत्यांमध्ये आत्तापासूनच मोठी क्रेझ पाहायला मिळत आहे. दुसरीकडे, अभिनेता इमरान हाश्मी या प्रोजेक्टशी जोडला गेल्यामुळे चाहत्यांकडून आनंद व्यक्त केला जात आहे. (Emraan Hashmi)
दरम्यान, गेल्या काही वर्षांत हॉरर चित्रपटांची लोकप्रियता मोठ्या प्रमाणात वाढली असून प्रेक्षकांकडून या प्रकारच्या चित्रपटांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. अशा परिस्थितीत इमरान हा नवा प्रोजेक्ट सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.
या चित्रपटाचं दिग्दर्शन मयंक शर्मा करत आहेत. ‘रुह’ हा चित्रपट २०२७ मध्ये हिंदी, तमिळ आणि तेलुगू भाषांमध्ये चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होईल.
दुसरीकडे, इम्रान हाश्मी सध्या त्याच्या ‘आवारापन-२’ या आगामी चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. जवळपास १८ वर्षानंतर हा सीक्वल प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
हेही वाचा:





