Nagar | कौशल्य विकास केंद्राच्या माध्यमातून युवकांना रोजगार : टेमकर

नगर, (प्रतिनिधी) – नगर महाविद्यालय भास्कर पांडुरंग हिवाळे सरांनी घेतलेला वारसा पुढे चालवत आहे. आजही ग्रामीण भागातील तरुणांना या कौशल्य विकास केंद्राच्या माध्यमातून आपल्या कौशल्य विकसित करण्याची व त्यातून रोजगार प्राप्तीची संधी ग्रामीण युवकांना प्राप्त होणार असून, ही जमेची बाजु आहे. या संधीचे सोने विद्यार्थ्यांनी केले पाहिजे, असे प्रतिपादन विलास टेमकर यांनी केले.
अहमदनगर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. जे. बार्नबस यांच्या मागदर्शनाखाली आचार्य चाणक्य कौशल विकास केंद्राच्या उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी उपप्राचार्य प्रा . दिलीप कुमार भालसिंग, प्रा . सुरेश घुले, प्रा. डाॅ. अभिजीत कुलकर्णी आणि संदीप साळवे उपस्थित होते.
विनाअनुदान विभागाचे समन्वयक प्रा.डॉ. सय्यद रज्जाक यांनी आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राचा उद्देश यामधील मान्य प्राप्त जी.एस.टी असिस्टंट आणि डोमेस्टिक डाटा एन्ट्री ऑपरेटर या दोन अभ्यासक्रमांना प्रति 60 विद्यार्थी प्रवेशित करण्याची परवानगी मिळालेली असून सर्व शाखेतील तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांना यासाठी प्राधान्य दिले जाईल.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे रजिस्ट्रार पिटर चक्रनारायण बांगर यांनी प्रयत्न केले. तसेच तांत्रिक सहाय्यासाठी संगणक विभागाचे वैभव वाबळे यांनी परिश्रम घेतले.


