“राज्यात शेतकऱ्यांसाठी आणीबाणीची परिस्थिती; संपूर्ण कर्जमाफी देऊन..” सुप्रिया सुळेंची राज्य सरकारकडे मागणी

मुंबई – महाराष्ट्रात यावर्षी दुष्काळाची स्थिती आहे. तर काही ठिकाणी अतिवृष्टीमुळे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांसाठी (Maharashtra Farmer) ही मोठी आणीबाणीची परिस्थिती आहे. या अशा कठीण काळात राज्य सरकारने केंद्र सरकारकडे आपले पाहणी पथक पाठवून परिस्थितीची पाहणी करून शेतकऱ्यांसाठी मदतीची आग्रही मागणी करायला हवी अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी केली आहे.
एक्सवर पोस्ट करत सुप्रिया सुळे म्हणाल्या, संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या काळात शरद पवार (Sharad Pawar) केंद्रीय कृषीमंत्री असताना देशाच्या कोणत्याही भागात अशी परिस्थिती उद्भवली तर तेथे केंद्र सरकारचे पथक जाऊन पाहणी करत असे आणि त्यानंतर तेथील शेतकऱ्यांना मदत करण्याची भूमिका घेतली जात असे. (Shinde fadanvis sarkar)
आतादेखील महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देऊन त्यांचा सातबारा कोरा करायला हवा. यासाठी राज्य सरकारने केंद्र सरकारकडे दुष्काळ आणि अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचीदेखील पाहणी करण्याची मागणी करावी. तसेच शेतकऱ्यांना दिलासा देऊन त्याला पुन्हा उभा करण्याच्या दृष्टीने जे काही करता येईल ते करायला हवे. राज्य सरकारने शेतकऱ्यांप्रती आपले कर्तव्य पार पाडण्याची ही वेळ आहे,” अशी मागणी सुप्रिया सुळेंनी केली.
महाराष्ट्रात यावर्षी दुष्काळाची स्थिती आहे. तर काही ठिकाणी अतिवृष्टीमुळे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांसाठी ही मोठी आणिबाणीची परिस्थिती आहे. या अशा कठिण काळात राज्य सरकारने केंद्र सरकारकडे आपले पाहणी पथक पाठवून परिस्थितीची पाहणी करून शेतकऱ्यांसाठी मदतीची आग्रही मागणी…
— Supriya Sule (@supriya_sule) November 27, 2023
लोकसभेत शेतकऱ्यांचा मुद्दा मांडणार आहे. आमचे सगळे पदाधिकारी सर्व राजकारण बाजूला ठेवून शेतकऱ्याला आणि काळ्या मातीशी इमान राखणाऱ्या कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांच्या पाठीशी पूर्ण ताकदीने उभे राहली. शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत करावी, अशी मागणी त्यांनी केली.दरम्यान, या पोस्टमध्ये त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना टॅग केले आहे.





