Elvish Yadav FIR : 9 विषारी कोब्रा साप, विष अन् परदेशी मुलींसोबत पार्टी ; बिग बॉस OTT विजेता एल्विश यादवविरुद्ध तक्रार दाखल

Elvish Yadav FIR : मागील काही दिवसांपासून बिग बॉस ओटीटीचा विजेता एल्विश यादव हा मागील काही दिवसांपासून चांगलाच चर्चेत आला आहे. काही दिवसापूर्वी एल्वीशला १ कोटीच्या खंडणीची मागणी करण्यात आल्याचे प्रकरण ताजे असताना आता एल्विश यादव याच्या अडचणी वाढल्याचे दिसत आहे. कारण त्याच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
यूट्यूबर एल्विश यादव विरोधात नोएडा पोलिसांनी तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी सेक्टर 49 मध्ये छापा टाकला होता. या छाप्यादरम्यान पोलिसांनी 9 कोब्रा साप आणि सापाचे विष जप्त केले होते. तसेच या प्रकरणी पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेतले. अटक केलेल्या लोकांची चौकशी करण्यात आली असून एल्विश यादवचेही या पाच जणांमध्ये नाव असल्याचे सांगण्यात येत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एल्वीश यादववर रेव्ह पार्टीच्या आयोजनाचा आरोप लावण्यात आला आहे. ट्युबर एल्वीशच्या पार्टीत बंदी घातलेले साप आणि परदेशी मुलींची समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे आता एल्वीश यादव याच्या अडचणीत वाढ झाल्याचे दिसत आहे.
एल्विशवर स्मगलिंगपासून ते बेकायदेशीरपणे रेव्ह पार्ट्या आयोजित करण्यापर्यंत सर्व गोष्टींचा आरोप आहे. तस्करीत गुंतलेल्या लोकांशी त्याचे संबंध असल्याचाही आरोप आहे. या प्रकरणी नोएडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सेक्टर-४९ पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे, नोएडा सेक्टर-५१ येथील बँक्वेट हॉलमध्ये पार्टी केल्याप्रकरणी आणि सापाचे विष देण्याप्रकणी एल्विश यादवसह ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एल्वीश सोडून राहुल, टिटूनाथ, जयकरण, नारायण आणि रविनाथ या पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे,





