Elon Musk: एलन मस्क यांचा भारत दौरा पुढे ढकलला

Elon Musk India Visit postponed –स्पेसएक्स आणि टेस्लाचे मालक एलन मस्क यांचा भारत दौरा पुढे ढकलण्यात आला आहे. आता ते या वर्षाच्या अखेरीस भारतात येणार आहेत. एलन मस्क 21 आणि 22 एप्रिलला भारतात येणार होते. यावेळी ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार होते. तसेच भारतातील उद्योग प्रतिनिधींना भेटणार होते. मात्र आता हा दौरा पुढे ढकलण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
वृत्तांनुसार मस्क यांचा दौरा पुढे ढकलण्याचे कारण सांगितले जात आहे की, टेस्लाच्या पहिल्या तिमाहीतील कामगिरीशी संबंधित प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी मस्क यांना 23 एप्रिल रोजी अमेरिकेतील कॉन्फरन्स कॉलमध्ये सहभागी व्हावे लागणार आहे. त्यामुळे त्यांनी तूर्त भारत दौरा पुढे ढकलला आहे.
मस्क भारतात 2-3 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार –
CNBC-TV18 ने वृत्त दिले आहे की, एलन मस्क भारतात 2-3 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करण्याची योजना जाहीर करतील. टेस्ला केवळ भारतासाठीच कार तयार करू इच्छित नाही, तर येथून जागतिक बाजारपेठेत निर्यातही करू इच्छितात. याशिवाय मस्क लवकरच भारतात उपग्रह आधारित ब्रॉडबँड सेवाही सुरू करू शकतात. Starlink साठी नियामक मंजुरी अंतिम टप्प्यात आहे आणि कंपनीला लवकरच परवाना मिळण्याची अपेक्षा आहे, असेही सांगितले जाते.





