Elon Musk : एक्स युझर्सला मोठा धक्का; एलॉन मस्कच्या कंपनीने प्रीमियम फीमध्ये केली ‘एवढी’ वाढ

एलन मस्क यांच्या एक्स कंपनीने आपल्या प्रीमियम प्लान्सच्या किमती वाढवल्या आहेत. या कंपनीने आपल्या प्रीमियम प्लान्समध्ये थेट ३५ टक्क्यांची वाढ केली आहे. हे नवीन दर २१ डिसेंबर पासून लागू झाले आहेत. ज्या लोकांनी प्लान घेतलाय, त्यांना पुढील महिन्यात येणाऱ्या बिलात नवीन दरानुसार पैसे द्यावे लागणार आहेत. चला तर मग जाणून घेऊया युझर्सला नक्की किती रुपये द्यावे लागणार…
नवीन दरानुसार X Premium+ युझर्सला आता दरमहा रु. १,७५० भरावे लागणार आहेत. याअगोदर त्यांना १,३०० रुपये द्यावे लागत होते. त्याचप्रमाणे वार्षिक प्रीमियम+ ची किंमत देखील १३,६०० रुपयांवरून १८,३०० रुपये करण्यात आली आहे. हे दर का वाढवण्यात आले? हेदेखील एलॉन मस्क यांनी जाहीर केले आहे.
‘या’ कारणामुळे वाढवले दर
पहिलं कारण आहे, आता या प्लॅटफॉर्मवर कोणतीच जाहिरात जाणार नाही.
दुसरं कारण म्हणजे, यात कंटेंट बनवणाऱ्या लोकांना अधिक पैसा दिला जाणार आहे.
तिसरं कारण आहे, या प्लॅटफॉर्मवर नव-नवीन फीचर्स देण्यात आली आहेत. प्रीमियम+ सब्सक्रिबरला अनेक फायदे मिळणार आहेत. त्यांना @Premium कडून मोठी मदत मिळेल. तसेच नवीन फीचर्स ‘Radar’चा वापर करणारे एक्सवरील एआय मॉडल्सचा जास्त वापर करू शकतील.





