चीनच्या ‘डीपसीक’ला टक्कर देण्यासाठी इलॉन मस्क सज्ज, लाँच केले जगातील सर्वात स्मार्ट AI मॉडेल

xAI Grok 3 | सध्या एकापेक्षा एक चांगले एआय आधारित चॅटबॉट मॉडेल सादर करण्याची कंपन्यांमध्ये स्पर्धा सुरू आहे. काही दिवसांपूर्वीच चीनचे डीपसीक एआय मॉडेल लाँच झाले होते. या एआय चॅटबॉटची खूप चर्चा झाली. आता डीपसीकला टक्कर देण्यासाठी इलॉन मस्क यांच्या कंपनीने Grok चॅटबॉटचे नवीन मॉडेल लाँच केले आहे.
इलॉन मस्क यांची AI कंपनी xAI ने नवीन चॅटबॉट Grok 3 लाँच केला आहे. मस्क यांनी या चॅटबॉटला सादर करताना खूप आनंद होत असल्याचे म्हटले आहे. तसेच, Grok 2 च्या तुलनेत यात अनेक नवीन बदल करण्यात आले आहे. हे जगातील सर्वात सर्वात स्मार्ट AI मॉडेल असल्याचाही दावा केला जात आहे.
Grok 3 आता थेट चीनच्या DeepSeek, गूगलच्या Gemini 2 Pro आणि OpenAI च्या ChatGPT 4o ला टक्क देईल. नवीन ग्रोक 3 एआय मॉडेल इतर एआय चॅटबॉटच्या तुलनेत विज्ञान, कोडिंग आणि गणिताच्या प्रश्नांना अधिक जलद व चांगल्या पद्धतीने उत्तर देते.
All you need to know to understand which company will win a technology competition is look at the first and second derivatives of the rate of innovation https://t.co/rImcrpzfeY
— Elon Musk (@elonmusk) February 18, 2025
नवीन मॉडेलच्या डेमो लाँचदरम्यान बोलताना मस्क म्हणाले की, आम्हाला Grok 3 सादर करताना खूप आनंद होत आहे. हे अतिशय कमी वेळेत Grok 2 पेक्षा कित्येक पटींनी अधिक चांगल्या पद्धतीने उत्तर देण्यास सक्षम आहे. हे सर्व एका उत्कृष्ट टीमच्या कठोर परिश्रमामुळे शक्य झाले आहे. अशा प्रतिभावान टीमसोबत काम करण्याचा मला अभिमान वाटतो.
xAI च्या नुसार, Grok 3 च्या सुरुवातीच्या व्हर्जनने चॅटबॉट अरेनामध्ये उत्कृष्ट स्कोर केला. चॅटबॉट अरेना ही एक क्राउडसोर्स्ड टेस्ट आहे, ज्या वेगवेगळ्या AI मॉडेल्सची तुलना केली जाते.
दरम्यान, यूजर्सला आजपासून Grok 3 चा वापर करता येणार आहे. सर्वातआधी X च्या प्रीमियम+ सबस्क्रिप्शन असलेल्या यूजर्सला अॅक्सेस मिळेल. तसेच, कंपनीने SuperGrok नावाने सबस्क्रिप्शन मॉडेल देखील लाँच केले आहे. यासाठी यूजर्सला महिन्याला 30 डॉलर शुल्क भरावे लागेल. हे सबस्क्रिप्शन घेतल्यावर यूजर्सला इतरही सुविधांचा फायदा मिळेल.





