Elon Musk : एलोन मस्कचा यू-टर्न.! आधी ट्रम्पला दोष दिला, आता पोस्टच डिलीट केली

Elon Musk | Donald Trump : एलोन मस्क यांनी पुन्हा एकदा स्वतःला वादाच्या भोवऱ्यात आणले आहे. ट्रम्प आणि मस्क यांच्यातील वादाची सर्वत्र चर्चा होत आहे. दोघांमधील दुरावा जगासमोर आला आहे. प्रत्यक्षात, मस्क यांनी ट्रम्पवर मोठा आरोप केला होता आणि जेफ्री एपस्टाईन फाइल्समध्ये ट्रम्पचे नाव समाविष्ट असल्याचे म्हटले होते. परंतु शनिवारी, मस्क यांनी X वरील आरोप असलेली पोस्ट डिलीट केल्याने या घटनेला आणखी एक वळण मिळाले. मस्कचा हा यू-टर्न पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेत आहे.
एलोन मस्कने एक्स वर पोस्ट करत लिहिले की, ‘आता मोठा धमाका करण्याची वेळ आली आहे. डोनाल्ड ट्रम्प एपस्टाईन फाइल्समध्ये आहेत. त्यामुळेच ते आतापर्यंत सार्वजनिक झाले नाहीत. शुभेच्छा डीजेटी’. मस्कने या पोस्टसोबत असेही लिहिले की ही पोस्ट भविष्यासाठी जपून ठेवा, सत्य बाहेर येईल. मात्र, आता मस्कने स्वतः ही पोस्ट डिलीट केली आहे.
Elon’s DELETED his post claiming Trump’s in the Epstein files https://t.co/cFOwyDWzSn pic.twitter.com/AzD2l6prh8
— RT (@RT_com) June 7, 2025
जेफ्री एपस्टाईन प्रकरण काय आहे?
जेफ्री एपस्टाईन प्रकरण अमेरिकेतील सर्वाधिक चर्चेत असलेल्या लैंगिक तस्करी प्रकरणांपैकी एक आहे. २०१९ मध्ये, एपस्टाईनवर अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण आणि तस्करीचा आरोप होता. त्यांच्यावर हाय-प्रोफाइल लोकांसाठी अल्पवयीन मुलींची व्यवस्था केल्याचा आरोप होता. २०१९ मध्ये तुरुंगात त्यांचे निधन झाले, ज्याची नोंद आत्महत्या म्हणून करण्यात आली. या वर्षी त्यांच्या काही फायली सार्वजनिक करण्यात आल्या, ज्यामध्ये अनेक प्रभावशाली लोकांची नावे होती, परंतु डोनाल्ड ट्रम्प यांचे नाव त्यात नव्हते.
Elon says REAL reason Epstein files not released because TRUMP in them
Dropping the ‘really big BOMB’ https://t.co/rz9YsVoJQs pic.twitter.com/xcB4rRVlLa
— RT (@RT_com) June 5, 2025
आधी त्यांनी आरोप केले आणि नंतर त्यांनी स्वतः ते मागे घेतले :
एलोन मस्कच्या पोस्टनंतर, लोक असा प्रश्न विचारू लागले की ट्रम्पचा या प्रकरणाशी खरोखर काही संबंध आहे का? मस्कने दावा केला की काही कागदपत्रे अद्याप सार्वजनिक केलेली नाहीत आणि त्यात ट्रम्प यांचे नाव असू शकते. परंतु नंतर त्यांनी पोस्ट हटवली. मस्कने कोणत्याही ठोस पुराव्याशिवाय असे विधान केले हे अनेकांना बेजबाबदार वाटले, विशेषतः जेव्हा त्यांनी स्वतः पोस्ट हटवली.
अलिकडच्या काळात मस्क आणि ट्रम्प यांच्यातील संबंध बिघडले आहेत. काही काळापूर्वीपर्यंत मस्क अमेरिकन सरकारच्या एका विभागात विशेष सल्लागार म्हणून कार्यरत होते. परंतु कर विधेयकावरून मतभेद झाल्यानंतर त्यांनी राजीनामा दिला. तेव्हापासून दोघांमध्ये शाब्दिक युद्ध सुरू आहे. ट्रम्पने मस्कवर विश्वास तोडल्याचा आरोप केला होता, त्यानंतर मस्कने प्रत्युत्तर देत म्हटले होते की ट्रम्प त्यांच्याशिवाय २०२४ ची निवडणूक जिंकले नसते.





