Elon Musk : एलन मस्कने रचला इतिहास! अशी कामगिरी करणारा ठरला पहिला उद्योगपती

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जगातील सर्वात श्रीमंत उद्योगपती एलन मस्क यांच्या संपत्तीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. एलन मस्क यांची एकूण संपत्ती आता 350 अब्ज डॉलरच्या पुढे गेली आहे. अशी कामगिरी करणारा तो पहिला उद्योगपती ठरला आहे. ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्सच्या आकडेवारीनुसार, एलन मस्कच्या संपत्तीत 10 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त वाढ झाली आहे.
जगातील सर्वात श्रीमंत उद्योगपती एलन मस्क यांच्या संपत्तीत मोठी वाढ झाली आहे. ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्स डेटानुसार, त्यांची एकूण संपत्ती आता 353 अब्ज डॉलर झाली आहे. आजपर्यंत एकही अब्जाधीश हे करु शकला नाही. काही दिवसांपूर्वी त्याने त्याचा जुना विक्रम मोडला होता. विशेष म्हणजे 300 अब्ज डॉलर्सचा टप्पा पार करणारा एलन मस्क हा एकमेव व्यक्ती आहे.
टेस्ला शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणात वाढ
टेस्ला शेअर्समध्येदेखील मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. सोमवारी टेस्लाच्या शेअर्समध्ये 3.46 टक्क्यांची वाढ झाली मात्र नंतर हे शेअर्स 357.09 डॉलरपर्यंत खाली आले. चालू वर्षात टेस्लाने गुंतवणूकदारांना 43.74 टक्के परतावा दिला आहे.





