एलॉन मस्क यांनी रचला मोठा इतिहास; 400 पार करणारे ठरले जगातील एकमेव व्यक्ती

Elon Musk Created History | टेस्लाचे सीईओ एलॉन मस्क यांच्या संपत्तीत मोठी वाढ झाली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणूक विजय मिळवल्यानंतर जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीच्या नावाचा किताब मस्क यांनी मिळवला आहे. जगात 400 अब्ज डॉलरची संपत्ती असलेले एलॉन मस्क हे एकमेव व्यक्ती आहेत.
ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, SpaceX च्या इनसाइडर ट्रेडिंग विक्रीमुळे मस्क यांच्या नेट वर्थमध्ये अचानक ५० अब्ज डॉलर्सची वाढ झाली आहे. शेअर बाजार बंद झाल्यानंतर आणि टेस्लाच्या शेअर्समध्ये वाढ झाल्यानंतर मस्क यांच्या संपत्तीत आणखी वाढ झाली आहे.
मस्क यांच्या नेट वर्थमध्ये भरभराट
ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्सनुसार, मस्क यांच्या एकूण संपत्तीत बुधवारी 62 अब्ज डॉलर्सची वाढ झाली आहे. त्यांची एकूण संपत्ती आता ४४७ अब्ज डॉलर्स झाली आहे. विशेष म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयानंतर आतापर्यंत मस्क यांच्या संपत्तीत १८३ अब्ज डॉलरची वाढ झाली आहे. दुसरीकडे, टेस्लाच्या शेअर्समध्येही ४ डिसेंबरपासून ७२ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे.
ब्लूमबर्ग अब्जाधीश निर्देशांकानुसार, १ जुलै २०२३ रोजी इलॉन मस्क यांची एकूण संपत्ती १२६ अब्ज डॉलर होती. ज्यामध्ये सुमारे दीड वर्षात ३.५५ पट म्हणजेच २५५ टक्के वाढ दिसून आली आहे.
अहवालानुसार, स्पेसएक्स आणि त्यांच्या गुंतवणूकदारांनी कंपनीचे इनसाइडर शेअर्स खरेदी करण्यास सहमती दर्शवल्यामुळे मस्क यांच्या संपत्तीत भरभराट झाली. या करारामध्ये, SpaceX चे मूल्य अंदाजे ३५० अब्ज डॉलर्स इतके होते. या करारामुळे मस्कची एकूण संपत्ती सुमारे ५० अब्ज डॉलरने वाढून ४४० अब्ज डॉलरवर पोहोचली आहे.
हेही वाचा:
Sharad Pawar : शरद पवारांनी तलवारीने केक कापत वाढदिवसाचे केलं सेलिब्रेशन; पाहा Video





