थेट इलॉन मस्क यांच्यासोबत काम करण्याची संधी, जाणून घ्या काय आहे नोकरीसाठी पात्रता

Elon Musk Post: मोठ्या कंपनीत चांगल्या पगाराची नोकरी मिळावी, असे प्रत्येकाला वाटते. अनेकदा अनुभवाची कमी अथवा नावलौकिक नसलेल्या विद्यापीठातून शिक्षण झालेले नसल्याने पात्र उमेदवारांनाही नोकरी दिली जात नाही. मात्र, आता थेट जगातील सर्वात श्रीमंत व्यक्त असलेल्या इलॉन मस्क यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळणार आहे. तुम्ही देखील मस्क यांच्यासोबत काम करू शकता. मस्क यांनी एक्सवर (ट्विटर) नोकरीची जाहिरात प्रसिद्ध केली आहे.
टेस्ला व स्पेसएक्सचे सीईओ इलॉन मस्क सध्या सॉफ्टवेअर इंजिनिअरपदासाठी भरती करत आहे त्यांच्या एव्हरिथिंग अॅपच्या निर्मितीसाठी ही भरती केली जात आहे. विशेष म्हणजे या पदासाठी शिक्षणाची कोणतीही अट नाही.
If you’re a hardcore software engineer and want to build the everything app, please join us by sending your best work to [email protected].
We don’t care where you went to school or even whether you went to school or what “big name” company you worked at.
Just show us your code.
— Elon Musk (@elonmusk) January 15, 2025
इलॉन मस्क यांनी ट्विट करत माहिती दिली की, तुम्ही जर सर्वोत्तम सॉफ्टवेअर इंजिनिअर असाल व एव्हरिथिंग ॲप तयार करण्याची इच्छा असल्यास, तुमचे सर्वोत्तम काम [email protected] वर पाठवून आमच्या टीममध्ये सहभागी व्हा. तुम्ही शाळेत गेला आहात की नाही किंवा कोणत्या कोणत्या शाळेत गेला आहात, कोणत्या मोठ्या कंपनीत काम केले आहे याच्याशी आम्हाला काहीही देणेघेणे नाही. केवळ, तुमचे सर्वोत्तम काम आम्हाला पाठवा.
इलॉम मस्क यांनी अशाप्रकारे नोकरीसाठी अर्ज मागवल्याने सोशल मीडिया यूजर्सकडून त्यांचे कौतुक केले जात आहे. दरम्यान, इलॉन मस्क सध्या एव्हरिथिंग ॲपवर काम करत आहे. या ॲपच्या माध्यमातून ई-कॉमर्स, मेसेजिंग, सोशल नेटवर्किंग, आर्थिक व्यवहार अशा वेगवेगळ्या सुविधा यूजर्सला एकाच ठिकाणी उपलब्ध करून देणे हा उद्देश आहे.





