‘एल्गार’ला परवानगी नाहीच
Updated On:

पुणे – कायदा सुव्यवस्था आणि करोनामुळे स्वारगेट पोलिसांनी एल्गार परिषदेला परवानगी नाकारली आहे. गणेश कला क्रीडा केंद्रात दि. 31 डिसेंबरला एल्गार परिषदेचे आयोजन करण्याच्या परवानगीसाठी समितीने स्वारगेट पोलीस ठाण्यात अर्ज केला होता.
कोरेगाव भीमा विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी दरवर्षी दि. 1 जानेवारीला हजारो अनुयायी भेट देतात. त्या पार्श्वभूमीवर एल्गार परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी समितीने अर्ज केला आहे. मात्र, त्यावर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी चर्चा करत परिषदेला परवानगी नाकारली.





