Kudalwadi : भल्या पहाटे कुदळवाडी येथे धार्मिक स्थळांसह ११ अनधिकृत बांधकामे हटविली; कारवाई दरम्यान दगडफेक
Kudalwadi : सात पोलिसांसह १९ जण जखमी : ५०० जणांवर गुन्हा दाखल

Kudalwadi : चिखली, कुदळवाडी आणि पवारवस्ती परिसरातील अनधिकृत बांधकामांवर मंगळवारी (दि. ९ जून) पहाटे मनपा प्रशासनाने धडक कारवाई केली. कड़क पोलीस बंदोबस्तात राबविण्यात आलेल्या या मोहिमेत जवळपास २८००१ चौ. फूट क्षेत्रफळाची ११ अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त करण्यात आली.
त्यामध्ये दहा धार्मिक स्थळांचा समावेश आहे. या कारवाई दरम्यान सुमारे ५०० जणांच्या जमावाने पोलिसांवर दगडफेक केली. यामध्ये पोलिसांसह एकूण १९ जण जखमी झाले अहोत. तीन सहायक पोलीस निरीक्षक आणि चार पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर शहराच्या विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरु आहेत.
पिंपरी-चिंचवडमधील चिखली, कुदळवाडीत मशीद, मंदिरांसह अकरा अनधिकृत बांधकामांवर मंगळवारी (दि.9) पहाटे कारवाई करण्यात आली. पोलिसांचा मोठा फौजफाटा घेऊन झालेल्या पाडीपाडी कारवाईदरम्यान तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. स्थानिकांनी महापालिकेच्या पथकावर दगडफेक केली.
यात पोलिसांसह १९ जण जखमी झाले आहेत. महापालिकेच्या ‘क’ व ‘फ’ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत येणाऱ्या चिखली, कुदळवाडी आणि पवारवस्ती परिसरातील अनधिकृत बांधकामांवर पहाटे महापालिका प्रशासनाने धडक कारवाई केली. कड़क पोलीस बंदोबस्तात राबविण्यात आलेल्या या मोहिमेत जवळपास २८००१ चौरस. फूट क्षेत्रफळाची ११ अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त करण्यात आली. यामध्ये अनधिकृत मस्जिद आणि मंदिरांचाही समावेश होता.
महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली बांधकाम परवानगी व अनिधिकृत बांधकाम नियंत्रण, अतिक्रमण निर्मूलन विभाग, तसेच पोलिसांच्या मोठ्या फौजफाट्यासह पहाटे ही कारवाई सुरु करण्यात आली. खबरदारीचा उपाय म्हणून घटनास्थळी ४ अग्निशमन वाहने आणि २ रुग्णवाहिका सज्ज ठेवण्यात आल्या होत्या.
दरम्यान, महापालिका टार्गेट करून वारंवार या भागात कारवाई करत असल्याचा आरोप करत स्थानिकांनी कारवाईला विरोध केला. यावेळी झालेल्या संघर्षात दगडफेक झाली असून यामध्ये १८ पोलिस कर्मचारी व १ नागरिक असे १९ जण जखमी झाले.
चिखली, कुदळवाडीत 2025 मध्ये चार हजाराहूंन अधिक गोदांमावर कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर काही दिवसांपूर्वी याच भागात चार अनधिकृत प्रार्थना स्थळे आणि आता पुन्हा 11 बांधकामांवर पालिकेने कारवाई केली. मंगळवारी पहाटे दोन वाजता कुदळवाडी आणि पवारवस्ती येथील धार्मिक स्थळांवर अतिक्रमण कारवाई करण्याचे मनपाचे प्रस्तावित होते. त्याबाबत मनपाकडून पोलिसांकडे बंदोबस्त मागवण्यात आला.
बंदोबस्त मध्यरात्री एक वाजता लावण्यात येणार असल्याचे आदेश देण्यात आले होते. त्यामुळे साडेबारा वाजल्यापासून बंदोबस्तावरील पोलीस कुदळवाडी येथे एकत्र आले. त्यापूर्वीच कुदळवाडीमधील किंग वजन काट्यासमोर शेकडो लोक जमा झाले होते. काही वेळेतच जमावातील काही लोकांनी अतिक्रमण कारवाईसाठी विरोध केला.
तसेच घोषणाबाजी सुरु केली. अचानक नागरिकांनी दंगल नियंत्रण पथकाच्या वाहनावर (एमएच १२/ व्हीसी ८१४८) दगडफेक सुरु केली. यामध्ये सहायक पोलीस निरीक्षक हरीश माने, राम गोमारे, दिनेश चव्हाण आणि चार पोलीस कर्मचारी जखमी झाले. त्यातील दोन पोलीस गंभीर जखमी झाले आहेत. सर्वांवर खासगी रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत.
पोलिसांवर दगडफेक होत असल्याने दंगल नियंत्रण पथकाने पोलीस नियंत्रण कक्षाला माहिती दिली. त्यानंतर अधिकचा बंदोबस्त तात्काळ पाठवण्यात आला. जमावाकडून झालेल्या दगडफेकीचे उत्तर देत पोलिसांनी बळप्रयोग केला. त्यानंतर जमाव पांगला. पळून जाणाऱ्या नाजीम नईम चौधरी (वय २६, रा. जाधववाडी, चिखली), इजाज वकार चौधरी (वय २६, रा. मोशी रोड, चिखली) या दोघांना पोलिसांनी पकडले. त्यांच्यासह ३०० ते ५०० अनोळखी व्यक्तींविरोधात चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कारवाईसाठी भलामोठा बंदोबस्त
या मोहिमेत मनपाच्या अभियांत्रिकी विभागाचे १२ कार्यकारी अभियंता, ३२ उप अभियंता, १८ कनिष्ठ अभियंता आणि ४२ स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (बीट निरीक्षक) सहभागी झाले होते. तसेच वीज वितरण कंपनीचे अधिकारी व कर्मचारी देखील सहभागी झाले होते.
कारवाई दरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी सुमारे ५०० पोलीस अधिकारी व कर्मचारी आणि जवळपास १५० एमएसएफ जवानांचा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. तसेच २२ पोकलेन, २६ जेसीबी आणि १२० मजुरांच्या सहाय्याने ही बांधकामे हटवण्यात आली. खबरदारीचा उपाय म्हणून घटनास्थळी ४ अग्निशमन वाहने आणि २ रुग्णवाहिका सज्ज ठेवण्यात आल्या होत्या.
पोलिसांकडून सात पथके नियुक्त
जमावातील दगडफेक करणाऱ्या व्यक्ती तसेच त्यांना चिथावणी देणाऱ्या व्यक्तींची ओळख पटवणे बाकी आहे. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि कारवाईच्या वेळी बनवलेले व्हिडीओ रेकॉर्ड हाती घेतले आहे. त्याआधारे संशयितांची ओळख पटवली जात आहे.
व्हिडीओ मध्ये दिसणारे अनेकजण बाहेरून आले असल्याचा अंदाज बांधला जात आहे. कारण व्हिडीओ मधील कोणत्याही व्यक्तीला स्थानिक नागरिक ओळखत नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे संशयितांची ओळख पटवणे आणि त्यांना अटक करण्यासाठी पोलिसांनी सात पथके तयार केली आहेत.
‘शहरातील अनधिकृत बांधकामांवर कोणतीही तडजोड न करता कठोर कारवाई करणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. अनधिकृत बांधकामे निष्कासित करणे हे शहरातील नियोजित व शाश्वत विकासासाठी आवश्यक आहे. कोणत्याही प्रकारच्या अनधिकृत बांधकामांना प्रशासनाकडून अभय दिले जाणार नाही. शहरातील पायाभूत सुविधा, सुरक्षितता आणि कायद्याचे पालन अबाधित राखण्यासाठी अशा कारवाया पुढेही सातत्याने राबविण्यात येतील. नागरिकांनीही बांधकाम करण्यापूर्वी सर्व आवश्यक परवानग्या घेऊनच पुढील कार्यवाही करावी.’ – डॉ. विजय सूर्यवंशी, आयुक्त, पिंपरी चिंचवड मनपा
‘कुदळवाडी येथे मनपाची अतिक्रमण कारवाई होणार असल्याने मनपाच्या मागणीनुसार बंदोबस्त देण्यात आला होता. बंदोबस्त लावण्यापूर्वीच लोक एकत्र जमा झाले होते. जमाव बाजूला करत असताना जमावाने पोलिसांवर आणि पोलिसांच्या वाहनावर दगडफेक केली. त्यात सात पोलीस जखमी झाले आहेत. जमावाला बाजूला केल्यानंतर अतिक्रमण कारवाई पूर्ण करण्यात आली.’ – डॉ. बसवराज तेली, अपर पोलीस आयुक्त, पिंपरी-चिंचवड
‘या कारवाईवेळी तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं होतं. मात्र, पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात ठेऊन कारवाई पार पाडल्याचा दावा केला. तसेच, शहरात ब-याच ठिकाणी अनधिकृत बांधकामे आहेत. त्यात इतरही धार्मिकस्थळांचा समावेश आहे. त्यावरही कारवाई करण्यात येणार आहे.’ – रवि लांडगे, महापौर
हेही वाचा:





